
इराण युद्ध संपत नाही तोवर अमेरिकेची वाकडी नजर क्युबाकडे वळली आहे. इराण युद्धाने हात पोळले असले तरी अमेरिका त्यातूनही धडा घ्यायला तयार नाही. अमेरिकेच्या अहवालानुसार क्युबाने रशिया आणि इराणकडून ३०० हून अधिक मिलिट्री ड्रोन खरेदी केले आहेत. अमेरिकेला त्यामुळे भीती आहे की या ड्रोन्सचा वापर अमेरिकेच्या सैन्य अड्ड्यांविरोधात केला जाऊ शकतो. त्यानंतर अमेरिकेने क्युबाची गुप्तचर संघटना आणि त्यांच्या बड्या नेत्यांवर निर्बंध लावले आहेत. क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डिएज कनाल यांनी इशारा दिला आहे की जर अमेरिकेने त्यांच्यावर हल्ला केला तर मोठा रक्तपात होईल. अमेरिकेच्या अगदी जवळ असलेला हा छोटा देश आजही स्वत: कोणत्याही मोठ्या धोक्यासाठी सज्ज ठेवत असतो.
क्युबा जरी आज सैन्य ताकदीत पहिल्या सारखा मजबूत नाही, परंतू अमेरिकेला त्याच्या युद्ध लढणे सोपे नाही. क्युबाचे सैनिक जुनी शस्रास्रे, जुगाड तंत्रज्ञान आणि मोठ्या संख्ये असलेले राखील दलाच्या मदतीने अशा रणनितीवर काम करतो, ज्यामुळे कोणताही हल्ला दीर्घकाळ आणि महागड्या युद्धात बदलू शकतो. तज्ज्ञ म्हणतात की जर केव्हाही अमेरिका आणि क्युबाच्या दरम्यान थेट संघर्ष झाला तर क्युबा इराणसारखा अमेरिकेल्या दीर्घ युद्धाच्या दलदलीत अडकवू शकतो.
सर्व लोकांसाठी युद्ध रणनिती
क्युबाची सर्वात मोठी ताकद त्याची War of All the People ( सर्व लोकांसाठी युद्ध ) पॉलिसी आहे. याचा अर्थ जर देशावर हल्ला झाला तर केवळ सैनिक नव्हे तर सर्वसामान्य नागरिक, मिलिशिया आणि निमलष्करी दल देखील युद्धात सामील होतील. क्युबाकडे सुमारे ५० हजार एक्टीव्ह सैनिक, ३९ हजार राखीव सैनिक आणि जवळपास ९० हजार पॅरामिलिट्री सदस्य आहेत. आणि गरज वाटली तर १० लाख लोकांना जमा करण्याची योजना आहे.
हे मॉडेल इराणच्या प्रॉक्सी आणि दीर्घ कालीन रणनिती सारखे मानले जाते. अमेरिकेच्या धमकीनंतर क्युबात देशभरात लोकांना गुरिल्ला वॉरची ट्रेनिंग दिली जात आहे. नागरिकांना आपात्कालिन स्थितीशी लढण्यासाठी तयार केले जात आहे.
अमेरिकेच्या जवळ असल्याचा फायदा
क्युबाची सर्वात मोठी ताकद त्याचे लोकेशन आहे. हा देश अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीपासून खूप जवळ आहे. जर संघर्ष वाढला तर अमेरिकेला त्यांच्या किनारपट्टी भागात, नौदल तळ आणि समुद्री मार्गावर सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावाला लागेल. क्युबाचे छोटे ड्रोन हल्ले देखील अमेरिकेसाठी आव्हान बनू शकतात.
जुगाड तंत्रज्ञान आणि गुरिल्ला मॉडल
क्यूबाकडे आधुनिक शस्रास्रे कमी आहेत, परंतू त्यांनी जुन्या शस्रास्रांना जोडून हायब्रिड सिस्टीम तयार केली आहे. जुन्या ट्रकवर एंटी-एअरक्राफ्ट गन लावली आहे. वेगवेगळ्या वाहनांच्या पार्ट्सना जोडून नवीन चिलखती वाहने तयार केली आहे. क्युबाचे सैन्य प्रदीर्घकाळापासून गुरिल्ला युद्धाचे प्रशिक्षण घेत आहे. म्हणजे थेट युद्धापेक्षा छोटे-छोटे हल्ले, लपून हल्ला करणे आणि शत्रूला थकवण्याचे रणनिती त्यांच्याकडे आहे.
गुप्तचर जाळे आणि राजकीय पकड
क्युबा अनेक काळापासून लॅटिन अमेरिकेत त्यांच्या गुप्तचर नेटवर्कसाठी ओळखला जातो. व्हेनेझुएला सारख्या देशात त्याचा प्रभाव आहे. अलिकडेच व्हेनेझुएलात निकोलस मादुरो सरकारवर केलेल्या कारवाईनंतर क्युबाला मोठा झटका बसला आहे. क्युबाने मान्य केले आहे की त्यांचे ३२ गुप्तचर एजंट तेथे मारले गेले. क्युबाचे सैन्य म्हणजे रिव्हॉल्युशनरी आर्म्ड फोर्सेस (FAR) त्या देशातील सर्वात ताकदवान संस्था आहे. याच्या संबंधित GAESA ग्रुप हॉटल, एअरपोर्ट, बँक आणि मोठा व्यवसाय सांभाळतो. म्हणजे सैन्य केवळ शस्रास्रांपर्यंत मर्यादित नाही तर अर्थव्यवस्था आणि प्रशासनावरही तिची मजबूत पकड आहे.
क्युबाची सर्वात मोठी कमजोरी
क्युबाची एअरफोर्स जवळपास संपलेली आहे. मिग-२९ आणि मिग-२३ सारखे जुनी लढाऊ विमाने बहुतांशी बंद पडलेली आहेत. संपूर्ण देशात २० विमानेच कार्यरत असल्याचे म्हटले जात आहे.नौदलात केवळ ३३ जहाजे आहेत. आधुनिक युद्धनौका किंवा मजबूत पाणबुड्या नाहीत. एअर डिफेन्स डिस्टीम देखील १९५० च्या दशकातील सोव्हिएत मिसाईलवर आधारित आहे. सर्वात मोठी समस्या वीज आणि आर्थिक संकटाची आहे. २०२५ मध्ये अनेक मोठे ब्लॅकआऊट झाले, ज्यामुळे मिलिट्री ट्रेनिंग आणि कम्युनिकेशन प्रभावित झाले आहे. इंधन,स्पेअर पार्ट्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी उणीव सैन्याला कमजोर बनवत आहे.