Headlines

संजय राऊत यांच्या अग्रलेखाने लहान मुलांचे ढुंगण..भाजप नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द

संजय राऊत यांच्या अग्रलेखाने लहान मुलांचे ढुंगण..भाजप नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द
संजय राऊत यांच्या अग्रलेखाने लहान मुलांचे ढुंगण..भाजप नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द


‘संजय राऊत यांना आता काय काम नाहीय, त्यांनी एखादं शौचालय किंवा गटार बांधलं आहे का ?’ असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. “संजय राऊत फक्त अग्रलेख लिहू शकतात,पण त्या अग्रलेखाने लहान मुलांचे ढुंगण साफ करण्याचे काम केले जाते. राऊतांनी कधी त्यांच्या अग्रलेखातून महाराष्ट्राच्या विकास लिहिला आहे का, नुसती मापं काढण्याचं काम राऊत करतात” अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद झाल्यानंतर समुद्राखालून नरेंद्र मोदी पाईपलाईन टाकणारं असल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती, यावरून पडळकर यांनी संजय राऊतांवर टीका करताना हा टोला लगावला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

“होर्मूझ सामुद्रधुनी काही काळ बंद राहिली तरी अनेक देशांचं तेल थांबलं होतं. भविष्यात भारताचा कायमचा इंधन प्रश्न सोडवण्यासाठी समुद्राखालून पाइपलाईन टाकण्याचा पर्याय विचाराधीन आहे” असं गोपीचंद पडळकर बोलले. त्यावर “पाइपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठीच पंतप्रधान मोदी समुद्राखालून परत येतील का? पाइपलाईन उभारणं हा दोन दिवसांचा विषय नाही” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्याला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं.

सदस्य किती फुटतात,त्याचा आकडा बघा

जयंत पाटलांच्या हाताखाली असणारे सगळेच भाजपात प्रवेश करतील,असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. “सांगली-सातारा विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर जयंत पाटलांचे ईश्वरपूरचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेतील सदस्य किती फुटतात,त्याचा आकडा बघा” असा सूचक इशारा देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशावरून पडळकर यांनी हे विधान केले आहे.

त्यांच्या बोलण्यावरुन वाद निर्माण झाले आहेत

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची नेहमीच चर्चा होते. अनेकदा त्यांच्या बोलण्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेची धार खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असते. त्यांनी शरद पवार यांच्यावर आतापर्यंत अनेकदा बोचरी टीका केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *