Headlines

धनंजय मुंडे यांचं जोरदार कमबॅक? राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता; थेट…मोठी माहिती समोर!

धनंजय मुंडे यांचं जोरदार कमबॅक? राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता; थेट…मोठी माहिती समोर!
धनंजय मुंडे यांचं जोरदार कमबॅक? राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता; थेट…मोठी माहिती समोर!


NCP Dhananjay Munde : राष्ट्रवादी पक्षात गेल्या काही दिवासांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. या पक्षाची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे या दोन बड्या नेत्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे भविष्यात लवकरच काहीतरी मोठं घडणार, असा दावा केला जात होता. दरम्यान, आता या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. पक्षाच्या कार्यकारणिती अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

देवगिरी बंगल्यावर बैठक, धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी?

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रावादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळण्याची सूत्रांची माहिती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत एक बैठक पार पडली आहे, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली असून तिथे खासदार पार्थ पवार हेदेखील उपस्थित होत, असे सांगितले जात आहे.

महिला लोकप्रतिनिधीचे नाव हटवले जाणार

आता नव्या कार्यकारिणीत हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि धनंजय मुंडे यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात असेल तर कोणाला डच्चू मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नावे काढून टाकावीत, यावरही चर्चा झाल्याचे सांगितेल जात आहे. एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात यावे, यावरही या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सुनिल तटकरे, पटेल शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, या बैठकीत नेमकं काय काय झालं? कोणाचं नाव वगळण्यात येणार? तसेच कोणालास संधी मिळणार? याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका पक्षाने स्पष्ट केलेली नाहीत. गेल्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत उल्लेख नव्हता. त्यामुळेच ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता कार्यकारिणीविषयी ही नवी माहिती समोर आल्यामुळे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *