Headlines

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान
Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान


Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मानImage Credit source: video grab/Twitter

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आलं. क्रिकेटमधील योगदानामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारताला चौथा मोठा नागरी पुरस्कार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागच्या वर्षी वनडे वर्ल्डकप जिंकला होता. पहिल्यांदाच भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. महिला क्रिकेटही कुठे मागे नाही? जेतेपद मिळवून कर्णधार हरमनप्रीत कौरने दाखवून दिलं होतं. हरमनप्रीत कौर पंजाबच्या छोट्याशा शहरातून आली आणि देशांचं नाव मोठं केलं. तिच्या अलौकिक कामगिरीसठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. हरमनप्रीत कौर हिचा जन्म 8 मार्च 1989 साली पंजाबच्या मोगा येथे झाला. लहानपणापासूनच हरमनप्रीत कौरला क्रिकेटची आवडी होती. तिने चांगल्या खेळीच्या जोरावर संघात स्थान मिळवलं आणि संघाचं कर्णधारपही भूषवलं.

हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. तिने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. तिने आतापर्यंत 7 कसोटी, 164 वनडे आणि 195 टी20 सामने खेळले आठहे. कसोटीत 230 धावा, वनडेत 4541 धावा आणि टी20 3991 धावा केल्या आहे. वनडे वर्ल्डकप 2017 मधील तिची नाबाद 171 धावांची कायम स्मरणात राहणारी आहे. तिने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध चमकदार कामगिरी केली.

भारतीय संघ पुन्हा एकदा तिच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जून महिन्यात या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तिच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद मिळणार का? याची उत्सुकता आहे.

प्रवीण कुमारला पद्मश्री पुरस्कार

पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पॅरा उंच उडीपटू प्रवीण कुमार याचाही सन्मान करण्यात आला. त्यालाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने दिव्यांग असूनही हार पत्कारली नाही. जिद्द बाळगून पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेत टी64 गटातील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून सुवर्ण पदक पटकावलं. इतकंच काय तर आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी केली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *