Headlines

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा, तिन्ही मनीषांच्या घरात…

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा, तिन्ही मनीषांच्या घरात…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा, तिन्ही मनीषांच्या घरात…


नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. या पेपरफुटीमुले लाखो विद्यार्थांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे पोलीस यंत्रणा वेगवान तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच आता लातूरमधून या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले असून लातूरमधील 8 प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहेत. या प्राध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयने तीन ठिकाणी कसून चौकशी केली. यावेळी मोटेगावकर क्लासेस, खासगी वसतिगृह तपासले, तसेच एका डॉक्टरची चौकशी केली.

महत्त्वाची बाब म्हणजे, या संबंधित प्रकरणातील तिन्ही आरोपी मनीषांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यावेळी तिघींच्या घरात बऱ्याच सोन्या-चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. या प्रकरणात आणखी गंभीर माहिती समोर येण्याची शक्यता असून संबंधित प्रकारात अजून कोण कोण सामील आहेत हे समोर येणे महत्त्वाचे ठरतंय



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *