Headlines

एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, नेमकी भानगड काय?

एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, नेमकी भानगड काय?
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, नेमकी भानगड काय?


कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ही बाब समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली.

गोकुळ दूध संघाने मुंबईस्थित ‘ज्युहफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ अर्थात Jamiat Ulama i Hind Halal Trust कडून हे हलाल प्रमाणपत्र घेतले आहे. हे प्रमाणपत्र 18 मार्च 2028 पर्यंत वैध राहणार आहे. हलाल प्रमाणपत्रामुळे संबंधित अन्नपदार्थ इस्लामी नियमांनुसार तयार करण्यात आले असून मुस्लिम ग्राहकांसाठी योग्य असल्याची खात्री दिली जाते.

या मुद्द्यावर अद्याप मोठ्या नेत्यांची स्पष्ट प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र हसन मुश्रीफ यांनी परदेशात उत्पादने पाठवण्यासाठी अशा प्रमाणपत्रांची गरज भासू शकते, असे सांगितले. तसेच संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर यावर अधिकृत भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *