
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने त्या दिवशी लाइव्ह टीव्हीवर बोलताना F शब्द वापरला होता. त्याने इंग्रजीत शिवी घातली होती. 20 मे रोजी राजस्थान रॉयल्सकडून लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाल्यानंतरची ही घटना आहे. ऋषभ पंत लखनऊ टीमचा कॅप्टन असल्याने माइक त्याच्या हातात होता. ऋषभ पंतने त्यावेळी जे शब्द वापरले, त्यासाठी त्याला प्रचंड ट्रोल केलं जातय. पण भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतचा बचाव केला आहे. “हरलेल्या टीमच्या कॅप्टनने लगेच बोलावं अशी प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची इच्छा होती. त्यावेळी पंत खूप भावूक झालेला. त्याला त्रास होत होता” असं सुनील गावस्कर ऋषभ पंतच्या बचावात बोलले.
लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने या सीजनमध्ये खूपच खराब प्रदर्शन केलं. या सीजनमध्ये त्यांचा प्रवास 10 व्या स्थानावर संपला. संपूर्ण सीजनमध्ये ऋषभ पंतवर खूप दबाव होता. त्याला आयपीएलमध्ये रेकॉर्ड किंमतील लखनऊ टीमने विकत घेतलेलं. टीमला प्लेऑफमध्ये घेऊन जाण्यात तो सलग दुसऱ्यावर्षी अपयशी ठरला. फलंदाजीतही त्याच्या कामगिरीत घसरण झाली. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्याआधीच लखनऊच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेलं.
त्यामुळे चिडचिड अजूनच वाढते
“ऋषभ पंतने F शब्द वापरला. पण ज्या कॅप्टनची टीम काही मिनिटं आधीच हरली आहे, त्याची मुलाखत घेणं गरजेचं होतं का?” असा प्रश्न निर्माण होतो असं गावस्कर यांनी त्यांच्या मिड-डे मधल्या कॉलममध्ये म्हटलं आहे. “जर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये संपला असेल तर कॅप्टन जास्त निराश होणं स्वाभाविक आहे. त्यात तो जर विकटेकिपर असेल,जो प्रत्येक चेंडूनंतर सतत स्टम्पकडे धावत असतो. त्यात हिट भरपूर आहे. त्यामुळे चिडचिड अजूनच वाढते” असं गावस्कर यांनी ऋषभ पंतच समर्थन करताना लिहिलं आहे.
एवढी अपेक्षा करणं जास्त आहे का?
“सामना संपल्यानंतर होणाऱ्या इंटरव्यूमध्ये हरलेल्या टीमच्या कॅप्टनला थोडा अधिक वेळ द्यावा. जेणेकरुन त्याला तयारी करता येईल. सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडू बरोबर पहिलं बोलणं जास्त चांगलं राहिलं” असं गावस्करांनी सुचवलं. “ऋषभ पंत हा क्रिकेट क्षेत्रातला आनंदी राहणारा खेळाडू आहे. त्याला त्याच्या वेगळ्या पद्धतीने खेळायला आवडतं. हरलेल्या टीमच्या कॅप्टनला त्या विचारातून बाहेर यायला थोडा वेळ दिला पाहिजे. त्याला श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही, तो पर्यंत तुम्ही त्याच्या तोंडासमोर माईक धरता. एवढी अपेक्षा करणं जास्त आहे का?” असं गावस्कर यांनी लिहिलं आहे.