Headlines

नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाह याच्या कॅबिनमध्ये नेमकं काय काय सापडलं?

नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाह याच्या कॅबिनमध्ये नेमकं काय काय सापडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाह याच्या कॅबिनमध्ये नेमकं काय काय सापडलं?


नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI समोर महत्त्वाची माहिती दिल्यानंतर तपासाला वेग आला आहे.

या प्रकरणातील आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हे पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’मध्ये फिजिक्स विषय शिकवत असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, त्यांनी आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून NEET-UG 2026 परीक्षेतील लीक झालेले फिजिक्सचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तेजस शाह यांच्या कॅबीनची झडती घेतली जात आहे. तसेच मॉक टेस्ट पेपरदेखील तपासले जात आहे. कॅबीनमधील सर्व बारिकसारिक वस्तूंचादेखील तपास केला जात आहे.

दरम्यान, लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे यांनाही CBI ने अटक केली आहे. त्यांनी पेपरफुटी प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांना आणि कोचिंग सेंटरशी संबंधित व्यक्तींना केमिस्ट्री विषयाचे लीक प्रश्न मिळवून देण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *