
गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोझर चालविण्यात आला आहे.
गेल्या काही नगरपालिकेच्या नोटीसनंतर संबंधितांकडून स्वतःहून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली असून सध्या या कारवाईची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना पी. व्ही. कुलकर्णी यांची बीडमध्ये मोठी मालमत्ता असल्याचे समोर आले होते. दिवसांपासून देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोझर चालविण्यात आला आहे.
शाहूनगर परिसरात त्यांचे मोठे व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने या बांधकामाची पाहणी केली होती. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन बांधकामाची मोजदाद व तपासणी केली असता अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
सदर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचे तसेच बांधकाम विनापरवाना आणि अनधिकृतपणे सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांना नोटीस बजावत बांधकाम स्वतःहून पाडून घ्यावे, अन्यथा पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
नगरपालिकेने दिलेल्या मुदतीनंतर आता पी. व्ही. कुलकर्णी यांच्या वतीने संबंधित बांधकाम स्वतःहून पाडण्यात येत आहे. बांधकामस्थळी बुलडोझर आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाडकाम सुरू असून या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या मालमत्तेवर होत असलेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.