
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्याचा शेवट मालिका विजयाने करण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया बांगलादेश दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही 9 जूनपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण 3 पैकी 2 खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. तर एकाला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
ऑस्ट्रेलियाचं त्रिकुट आऊट
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि तनवीर संघा हे दोघे संपूर्ण बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनसुार, हेडला वैयक्तिक कारणामुळे विश्रांती देण्यात आली आहे. तर तन्वीर संघा याला पाकिस्तान दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. तर मिचेल मार्श याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. मात्र मार्श टी 20I सीरिजआधी टीमसह जोडला जाणार आहे. या 3 खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी 20I संघात बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
जोश इंग्लिस याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी
मिचेल मार्श याच्या अनुपस्थितीत जोश इंग्लिस बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. जोशने पाकिस्तान दौऱ्यातही कांगारुंचं नेतृत्व केलं होतं.
मिचेल मार्श दुखापतीमुळे वनडे सीरिजमधून बाहेर
Australia have been forced to reshuffle their squads for upcoming white-ball fixtures in Bangladesh 👀
Details 👇https://t.co/0Zvom4kEpS
— ICC (@ICC) June 8, 2026
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात कुणाला संधी?
ओलीवर पीक आणि मॅथ्यू शॉर्ट या दोघांना एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. तर टॉड मर्फी याला तन्वीर संघा याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तन्वीरला पाकिस्तान विरुद्ध लाहोरमधील दुसऱ्या वनडेत दुखापत झाली होती.
बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : जोश इंग्लिस (कर्णधार), झेव्हीयर बार्टलेट, एलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लबुशेन, टॉड मर्फी, ऑलिव्हर पीक, मॅथ्यू रेनशॉ, लियाम स्कॉट, मॅथ्यू शॉर्ट आणि एडम झॅम्पा.