Headlines

मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच ‘उबाठा’त मोठा भुकंप?

मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच ‘उबाठा’त मोठा भुकंप?
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच ‘उबाठा’त मोठा भुकंप?


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक हालचाली घडत असतानाच. अशात ऐन बैठकीआधी ठाकरेंचे आमदार खासदार नॉट रिचेबल होत असल्याची सुत्रांची माहिती आहे. आधीच भाऊसाहेब वाकचौरे हे नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी एका नेत्याचा पत्ता नसल्याचं सांगितलं जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे सध्या नॉट रिचेबल आहेत असं चित्र आहे. या आधी यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले होते. ठाकरेंचे खासदार भर मंचवरून बोलले होते. जाधव म्हणाले, “मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही.” जाधव यांनी सूचक वक्तव्य करत आपल्या पुढील भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यांच्या या विधानामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र चर्चांना पुरता पुर्णविरामदेखील लागला होता. आता ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकी आधीच नॉट रिचेबलच्या प्रकरणामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *