Headlines

दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?

दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र  मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?
दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र  मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?


उत्तराखंडमधील शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ अशी मसुरीची ओळख आहे. पण तिथल्या एका होमस्टेमध्ये दिल्लीच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.घटनास्थळावरचं दृश्य भितीदायक होतं. दारुच्या दोन रिकामी बाटल्या, बेडवर रक्ताने माखलेली चादर आणि बेडरुममध्ये जमिनीवर पडलेला पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह असं चित्र होतं. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. त्या रात्री बंद खोलीच्या आत काय घडलं?. ज्यामध्ये एका हसऱ्या खेळकर नवविवाहितेचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पण घटनास्थळावरच्या परिस्थितीमुळे मर्डर मिस्ट्रीचा गुंता सोडवणं कठीण आहे.

सोमवारी सकाळी 112 कंट्रोल रुमच्या माध्यमातून मसुरी पोलिसांना सूचना मिळाली की, कियाना होमस्टे मध्ये थांबलेल्या एका महिलेची हालत गंभीर आहे. ती काहीच हालचाल करत नाहीय. देवेंद्र सिंह चौहान पोलीस टीम आणि 108 एंबुलेंस घेऊन घटनास्थळी पोहोचले, तेव्हा एंबुलेंसमधील फार्मासिस्टने तपासल्यानंतर महिलेला मृत घोषित केलं. खोलीच्या आतील दृश्य पोलिसांसाठी धक्कादायक होतं. मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत जमिनीवर पडलेलं. बेडच्या चादरीवर रक्त होतं. पोलिसांचं फॉरेन्सिक युनिट तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तिथे जाऊन वीडियोग्राफी आणि फोटोग्राफी केली. महत्वाचे नमुने गोळा केले. खोलीतील दारुच्या दोन रिकाम्या बाटल्या आणि खाद्य सामग्री ताब्यात घेतली.

अवघ्या सात महिन्यापूर्वी तिचं लग्न झालेलं

मृत महिलेची ओळख पटली असून पी. राधा गायत्री तिचं नाव आहे. तिचं वय 27 वर्ष आहे. ती मूळची विशाखापट्टनमची राहणारी आहे. सध्या ती नवी दिल्लीत किदवई नगर ईस्ट येथे राहत होती. गुरुग्राम येथील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. अवघ्या सात महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं. 8 नोव्हेंबर 2025 रोजी सौम्या श्रीचरण सोबत तिचं लग्न झालेलं. दोघे आयटी प्रोफेशनल होते. लग्नानंतर दोघे वेगवेगळ्या शहरात नोकरी करत होते. नवरा सौम्या श्रीचरण पुण्याच्या आयटी कंपनीत नोकरीला आहे.

आम्ही रात्री मद्य प्राशन केलं

सौम्या श्रीचरणने पोलिसांना सांगितलं की, ते दोघे 13 जूनला दिल्लीहून उत्तराखंड फिरायला निघाले होते. ऋषिकेशमध्ये थांबल्यानंतर ते 14 जूनच्या रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास मसुरीच्या या होमस्टेमध्ये आले. नवऱ्याने सांगितलं की, आम्ही रात्री मद्य प्राशन केलं. पहाटे 3.30 च्या सुमारास डोळा लागला. सकाळी डोळे उघडले, तेव्हा पत्नी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत होती. नाकातून रक्त येत होतं. घाबरून त्याने लगेच होमस्टे व्यवस्थापन आणि पोलिसांना माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *