
तिरंगी मालिकेतील मागच्या सामन्यात भारतीय अ संघाचा सुपरओव्हरमध्ये पराभव झाला. श्रीलंका अ संघाविरूद्धचा हा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त गाजला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानात वादवादी, धक्काबुक्की झाली होती. भारतीय अ संघाचा आज अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध सामना सुरु आहे. फायनलमध्ये प्रवेशाच्या दष्टीने भारतासाठी हा सामना करो या मरो आहे. या महत्वाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. श्रीलंकेविरुद्ध जे घडलं, त्याचा राग वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगमध्ये दिसेल अशी अपेक्षा होती. पण चाहत्यांच्या या अपेक्षा फोल ठरल्या. वैभव सूर्यवंशीने आजही निराश केलं.
वैभव सूर्यवंशीचा खेळ तर आज शुन्यावर संपणार होता. मैदानावरील अंपायरने त्याला आऊट दिलेलं. पण थर्ड अंपायरने व्हिडिओ एनालिसिस करुन नाबाद ठरवलं. वैभव थोडक्यात शुन्यावर आऊट होण्यापासून वाचला. वैभवला सामन्यात फक्त एकच जीवनदान मिळालं नाही, तर त्यानंतर त्याची अजून एक कॅच ड्रॉप झाली. 8 चेंडूत दोनवेळा जीवनदान मिळूनही वैभव सूर्यवंशीने अफगाणिस्तान अ विरुद्ध फक्त 38 धावाच केल्या. त्याच्याकडून या पेक्षा मोठ्या खेळीची अपेक्षा होती. आज 17 जून रोजी दांबुला मध्ये अफगाणिस्तान अ विरुद्ध हा सामना सुरु आहे. वैभव सूर्यवंशीला पहिलं जीवनदान चौथ्या चेंडूवर मिळालं. त्यावेळी वैभवने खातही उघडलं नव्हतं.
आधी वैभव आऊट असं वाटलं
भारतीय इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने शम्स उर रहमानच्या चेंडूवर शानदार शॉट मारला. पण हा शॉट जितका सुंदर होता, तितकीच कमालीची कॅच अफगाण खेळाडूने पकडली. आधी वैभव आऊट आहे असं वाटलं. पण थर्ड अंपायरने प्रत्येक अँगलने चेक केल्यानंतर चेंडू फिल्डरच्या हातात येण्यापू्वी मैदानाला टच केल्याचं स्पष्टपणे दिसतं होतं. परिणामी त्यांनी वैभवला नाबाद ठरवलं.
आज वैभवने किती फोर, सिक्स मारले?
वैभव सूर्यवंशीला दुसरं जीवनदान डावाच्या 11 व्या चेंडूवर 7 धावांवर मिळालं. यावेळी सुद्धा एक मोठा फटका खेळताना मिसटाइम झालं. चेंडूवर हवेत गेला, पण अफगाणिस्तानच्या खेळाडूला कॅच पकडता आली नाही. या दोन जीवनदानाचा वैभव सूर्यवंशी फायदा उचलेलं असं वाटत होतं. त्याने काही मोठे फटके खेळल्यानंतर अपेक्षा वाढल्या. पण चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. वैभव सूर्यवंशी 27 चेंडूत 38 धावा करुन आऊट झाला. वैभवने 4 चौकार आणि दोन षटकार खेचले.