Headlines

सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे…खरेदीसाठी श्रींमतांकडून कोट्यवधींची बोली, आहे तरी काय खास?

सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे…खरेदीसाठी श्रींमतांकडून कोट्यवधींची बोली, आहे तरी काय खास?
सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे…खरेदीसाठी श्रींमतांकडून कोट्यवधींची बोली, आहे तरी काय खास?


सोनं, हिऱ्यापेक्षाही महाग हे घरटे

Swiftlet bird Viral Bird Nest: निसर्गाचे चमत्कार अनंत, अगाध आहे असे म्हणतात. मानवाला त्यातील काहीसाच भाग कळल्याचे मानले जाते. अनेक जीव सुंदर दिसतात. काही पक्ष्यांकडे नकला करण्याची कला असते. कुणाकडे सुतारकामाची खुबी असते. तर काही पक्षी हे गगनभेदी आवाजासाठी प्रसिद्ध असतात. तर ही एक छोटी चिमणी तिच्या सुबक घरटे विणकामासाठी प्रसिद्ध आहे. अनेक चिमण्या, पक्षी घरटी तयार करतात. पण या चिमणीची बातच काही और आहे. कारण इतर पक्षी हे काडी, पानं आणि इतर वस्तूंचा वापर करून घरटी तयार करतात तर ही चिमणी घरटे बांधण्यासाठी तिच्या लाळेचा वापर करते. यामुळेच या घरट्याला जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते मौल्यवान आहे.

लाळेपासून कसे तयार करते घरटे?

तर या चिमणीचे नाव स्विफ्टलेट असे आहे. इतर पक्षी घरटं तयार करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करतात. ही चिमणी घरटं तयार करण्यासाठी लाळेचा वापर करते. या चिमणीची लाळ घट्ट असते. ती हवेच्या संपर्कात येताच घट्ट होते. या लाळेच्या मदतीने ही चिमणी एक घट्ट आणि मजबूत घरटं तयार करते. हे घरटे कपाच्या आकाराचे असते. अनेक दिवसांच्या कष्टानंतर स्विफ्टलेट पक्षी घरटं तयार करतो. ते अत्यंत टिकाऊ असते. त्यामुळेच अनेक श्रीमंत या घराट्यासाठी बोली लावतात. ही चिमणी उंच ठिकाणी, टेकडीवर, समुद्राच्या किनारी, गुफांमध्ये अथवा थोड्या आडवळणाला हे घरटं तयार करते.

लाखो-कोट्यवधींची बोली

स्विफ्टलेटने बांधलेले घरटे अनोखे असल्याने ते घरी आणण्यासाठी चढाओढ असते. हे घरटे शोधणे आणि ते सुरक्षित आणणे हे सुद्धा सोपे काम नसते. हे घरटे नशीब उघडते असाही एक समज आहे. त्यामुळे आशियातील अनेक श्रीमंत लोक या घरट्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. या घरट्याची विशिष्ट रचना आणि त्याची सुबकता यासाठी वाट्टेल ती किंमत मोजली जाते. चीन, हाँगकाँग, सिंगापूर सारख्या देशात या घरट्यांची कमालीची मागणी आहे.

अजून एक अजब प्रकार म्हणजे स्विफ्टलेट पक्षाचे घरटे खाद्यपदार्थ म्हणून खाल्ले जाते. त्याचे सूप तयार करण्यात येते. श्रीमंतांच्या जेवणात ही आलिशान डिश हमखास दिसते. त्यासाठी पैसे मोजले जातात. त्यासाठी खास मागणी केली जाते. अनेक महागड्या हॉटेलमध्ये ही महागडी डिश तयार होते. या घरट्याचे सूप पिणे हे शरीराला फायदेशीर असल्याचाही दावा करण्यात येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *