Headlines

मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग

मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग
मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग


अनेकांकडे वेळेची कमतरता असते आणि शरीरास लाभदाय खाण्याची गरज प्रत्येकाला असते. अशात मखाना एकमेव पर्याय आहे, जो झटपट तयार देखील होतो आणि आरोग्यास देखील अत्यंत लाभदायक आहे. सांगायचं झालं तर, आरोग्यदायी आहार घेणाऱ्यांमध्ये मखाना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हा एक हलका, पौष्टिक आणि सहज पचणारा पदार्थ मानला जातो. मखान्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे, संतुलित आहाराचा भाग म्हणून याची शिफारस केली जाते. कमी कॅलरी आणि कमी चरबीयुक्त असल्यामुळे, हा एक लोकप्रिय आरोग्यदायी नाश्ता देखील आहे.

मखाना खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते, पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. तसेच, हाडांचं आरोग्य आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठीही मखाना उपयुक्त आहे. मखाना अनेक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पद्धतींनी बनवता येतो, ज्यामुळे चव आणि पौष्टिक फायदे दोन्ही मिळतात.

मखान्यासोबत ह्या 5 आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी बनवा

ग्रील्ड मखाना : एका तव्यावर थोडं तूप किंवा ऑलिव्ह ऑइल घालून मखाना तळून घ्या. त्यात काळी मिरी, हळद, चाट मसाला किंवा थोडे सिंधू मीठ घाला. हा एक झटपट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत होतं.

मखाना चाट : भाजलेल्या मखान्यात टोमॅटो, कांदा, काकडी, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि थोडा चाट मसाला घालून चाट बनवा. इच्छित असल्यास, तुम्ही त्यात उकडलेले चणे देखील घालू शकता. हा एक हलका नाश्ता आहे जो स्वादिष्ट असून फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.

मखाना रायता : मखाना हलका तळून त्याचे लहान तुकडे करा. ते दह्यामध्ये मिसळा आणि त्यावर भाजलेले जिरे, काळे मीठ व हिरवी कोथिंबीर घाला. हा एक थंड आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स यांचे उत्तम मिश्रण पुरवतो.

मखाना भेल : भाजलेल्या मखान्यात काकडी, टोमॅटो, कांदा, हिरवी कोथिंबीर, भाजलेले हरभरे आणि लिंबाचा रस घालून भेळ तयार करा. चवीनुसार तुम्ही त्यात थोडा चाट मसाला घालू शकता. हा कमी कॅलरी असलेला एक आरोग्यदायी नाश्ता आहे, जो फायबर आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत मानला जातो.

मखाना खीर : दूध उकळून त्यात हलके भाजलेले मखाने घाला आणि मंद आचेवर शिजवा. चवीसाठी तुम्ही वेलची, थोडा सुका मेवा आणि थोडासा गूळ किंवा खजुराची पेस्ट घालू शकता. हा एक पौष्टिक गोड पदार्थ आहे, जो कॅल्शियम, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पण आहात कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *