
ठाकरे गटात सुरू असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर आता १३० ज्येष्ठ शिवसैनिक पुन्हा मैदानात उतरले आहेत.
पक्षातील नाराजी आणि गळती रोखण्यासाठी या ज्येष्ठ शिवसैनिकांनी पुढाकार घेतला असून, आज सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ‘चलो मातोश्री दर्शन’ या उपक्रमातून मुंबईतील मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि पक्ष एकजूट करण्यासाठी पाऊल पुढे टाकले. या भेटीत नेमकं काय घडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यामध्ये नेमकं काय संभाषण झालं याची माहिती दिली जात आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला आत्मपरीक्षण करायला सांगितलं जात आहे’, यावर ज्येष्ठ शिवसैनिकांनी उत्तर दिलं, ‘साहेब आदेश द्या, आम्ही दगड मारणं सोडलंय, विसरलो नाही’.