Headlines

फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक


फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता फक्त 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रकImage Credit source: Getty Images

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 फेरीतून उपांत्यपूर्व फेरीत आठ संघांची वर्णी लागली आहे. आता उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी आठ संघांमध्ये चुरस असणार आहे. या स्पर्धेतून एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 40 संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतून तीनही यजमान देश बाद झाले आहेत. आता उपांत्यपूर्व फेरीत आणखी 4 संघ बाद होतील. उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स, मोरक्को, स्पेन, बेल्जियम, नॉर्व, इंग्लंड, अर्जेंटीना आणि स्वित्झर्लंड या संघांनी एन्ट्री मारली आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या आठ संघांची खासियत म्हणजे. यात 4 संघांनी यापूर्वी जेतेपद मिळवलं आहे. तर चार संघ नवे दावेदार आहे. त्यामुळे पुढच्या फेरीचं तिकीट कोणत्या चार संघांना मिळणार याची उत्सुकता आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात नॉर्वे संघाने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बलाढ्य ब्राझीलचा पराभव करून एन्ट्री मारिली आहे. तर मोरक्कोने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अशी कामगिरी करमारा पहिला अफ्रिकन देश आहे. स्वित्झर्लंडने 72 वर्षांनी पहिल्यांदाच अंतिम 8 संघात पोहोचला आहे. यापूर्वी 1954 मध्ये ही कामगिरी केली होती. बेल्जियमही जेतेपदाचा नवा दावेदार आहे. पण यापूर्वी 2018 मध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं. तर 2014 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर 1986 मध्ये चौथ्या स्थानावर होता.

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सामना क्रमांकस्पर्धातारीखवेळ (IST)स्थळ
QF 1फ्रान्स विरुद्ध मोरोक्को10 जुलै, 2026रात्री 01:30बॉस्टन स्टेडियम, मॅसॅच्युसेट्स
QF 2स्पेन विरुद्ध बेल्जियम11जुलै, 2026रात्री 12:30लॉस एंजेलिस स्टेडियम, कॅलिफोर्निया
QF 3नॉर्वे विरुद्ध इंग्लंड12 जुलै, 2026रात्री 02:30वाजतामियामी स्टेडियम, फ्लोरिडा
QF 4अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड12 जुलै, 2026सकाळी 6:30 वाजताकॅन्सस सिटी स्टेडियम, मिसूरी

आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरीत असलेल्या 4 माजी चॅम्पियन्स संघांमध्ये अर्जेंटीना, फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन हे देश आहेत. अर्जेंटीनाने आतापर्यंत तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या वर्षी जेतेपद मिळवलं होतं. तर फ्रान्स दोन वेळा जगजेता ठरला आहे. तसेच इंग्लंड आणि स्पेनने प्रत्येकी एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *