
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडल्याने चर्चांना आणखी चालना मिळाली होती. या सर्व चर्चा अजून ताज्याच असतानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. इतकेच नाही तर या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यांचही समोर आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी तब्बल 30 मिनिटं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.