Headlines

FIFA : विजयी जल्लोष इंग्लंडच्या खेळाडूला पडला महागात, हात तुटल्याने उपांत्यपूर्व फेरीला मुकला Video

FIFA : विजयी जल्लोष इंग्लंडच्या खेळाडूला पडला महागात, हात तुटल्याने उपांत्यपूर्व फेरीला मुकला Video
FIFA : विजयी जल्लोष इंग्लंडच्या खेळाडूला पडला महागात, हात तुटल्याने उपांत्यपूर्व फेरीला मुकला Video


FIFA : विजयी जल्लोष इंग्लंडच्या खेळाडूला पडला महागात, हात तुटल्याने उपांत्यपूर्व फेरीला मुकला VideoImage Credit source: GETTY IMAGES/Instagram

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आश्चर्यकारक निकाल लागले असून दिग्गज संघ बाद झाले आहे. असं असताना आतापर्यंत 48 पैकी 40 संघ बाद झाले असून उपांत्यपूर्व फेरीत 8 संघांची वर्णी लागली आहे. हॅरी केनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने यजमना मेक्सिकोला पराभूत केलं आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा सामना नॉर्वेशी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी मिडफील्डर जॉर्डन हँडरसन खेळू शकणार नाही. कारण त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. राउंड ऑफ 16 मध्ये यजमान मेक्सिकोला पराभवाची धूळ चारल्यानंतर विजयी जल्लोष करताना एक चूक झाली आणि हँडरसनचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकणार नाही. इतकंच काय तर पुढच्या सामन्यातही त्याचं खेळणं कठीण आहे.

इंग्लंडने मेक्सिकोविरुद्धचा सामना 3-2 ने जिंकला होता आणि उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवलं. या विजयामुळे इंग्लंडचं जेतेपद मिळवण्याच्या आशा दुणावल्या आहेत. त्यामुळे हा विजय इंग्लंडच्या खेळाडूंसाठी खूपच महत्त्वाचा होता. विजय होताच सर्व खेळाडू फॅन्ससह सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल झाले. या जल्लोषाकत 36 वर्षीय जॉर्डन हँडरसन दुखापतग्रस्त झाला.

कसा झाला हँडरसनचा हात फ्रॅक्चर?

सामना संपल्याची शिटी वाजली आणि इंग्लंडचे काही खेळाडू जल्लोष करण्यासाठी चाहत्यांकडे गेला. खेळाडूंनी चाहत्यांसोबत खूप वेळ जल्लोष केला. त्यानंतर मैदानात परतत असताना डिजिटल जाहिरातीच्या बोर्डवरून उडी मारून मैदानात येत होते. तेव्हा हँडरसन असं असताना तोंडावर पडला आणि डावा हात मुरगळला. त्यामुळे वेदनेने कळवळला. त्यानंतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली आणि मेडिकल टीमने तपासणी केली. हँडरसनला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं.

सर्जरीनंतर संघात परतला पण खेळणं कठीण

मेक्सिको सिटीच्या रुग्णालयात हँडरसनची तपासणी झाली. त्यात त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या वेदना पाहून तात्काळ सर्जरी केली गेली. हँडरसनने रुग्णालयाच्या बेडवरून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच नेमकं काय घडलं त्याची माहिती दिली. त्याने सर्जरी करणाऱ्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचे आभार मानले. आता मेक्सिकोतून अमेरिकेत आला असून कँसस सिटीत इंग्लंडच्या टीम कँम्पमध्ये आहे. उपांत्यपूर्व फेरीत खेळणार नाही हे निश्चित आहे. पण उपांत्य फेरीतही खेळणं कठीण असल्याचं दिसत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *