
डीमार्टमध्ये वीकेंड म्हणजे शनिवार-रविवारी किंवा सणासुदीच्या दिवसात बऱ्याच फेस्टिव्हल ऑफर्स असतात. मात्र काही वेळा जुना स्टॉक म्हणजे स्टॉक क्लिअरन्स किंवा कमी प्रतीची वस्तू डिस्काउंटमध्ये ठेवली जाते. त्यामुळे कधीही तारीख आणि किंमत तपासून खरेदी करा, अन्यथा फायदा न होता नुकसान होऊ शकतं. डाळ, तांदूळ, तेल यासारख्या स्टेपल आयटम्स किंवा दैनंदिन जीवनातील आवश्यक धान्य बल्कमध्ये खरेदी करा जेणेकरून पैशाची बचत होऊ शकते पण गरज असेल इतकेच खरेदी करा स्वस्त मिळते म्हणून जास्त खरेदी करुन ठेवू नका.