Headlines

आधी मुलं होऊ द्या, त्यानंतर शारीरिक संबंधांवर… विनायक राऊतांचा सल्ला, सूनेने थेट..

आधी मुलं होऊ द्या, त्यानंतर शारीरिक संबंधांवर… विनायक राऊतांचा सल्ला, सूनेने थेट..
आधी मुलं होऊ द्या, त्यानंतर शारीरिक संबंधांवर… विनायक राऊतांचा सल्ला, सूनेने थेट..


ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेचा नगरसेवक गितेश राऊत याची पत्नी गिरीजा राऊत हिने गंभीर आरोप केले. हेच नाही तर पती गितेश शारीरिक संबंधास नकार देत. दरवेळी त्याच्याकडून काही वेगळी कारणे सांगितले जात. मुंबईत आईला आवाज ऐकू जाईल आणि गावी मदतनीसला आवाज जाईल म्हणून तो कायम शारीरिक संबंध टाळत. विदेशात गेल्यावर त्याच्या जवळ गेले असता त्याने माझ्यापासून दूर राहा. अक्कल आहे का म्हणत मारहाण केली, असल्याचा गंभीर आरोप गिरीजा राऊतने पोलिस तक्रारीत केला. या प्रकरणात गुन्हेही दाखल झाले. मात्र, विनायक राऊत यांच्या सूनेने केलेल्या आरोपांनंतर खळबळ उडाली. सुरूवातीपासूनच आपल्यासोबत काय काय घडले हे तिने सांगितले.

गिरीजा राऊतने आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले की, माझा पती सासू माझा छळ करत. माझ्या कुटुंबियांना खालच्या भाषेत बोलत. यासर्व गोष्टींमुळे मी मानसिक तणावाखाली आले. डॉ अनिकेत मांद्रेकर यांच्याकडे मी उपचार देखील घेतले. मला आणि माझ्या पतीला अॅटी-डिप्रेसंट गोळ्या देखील डॉक्टरांनी दिल्या होत्या. मात्र, ते गोळ्या घेत नव्हते. आम्ही सेक्सोलॉजिस्ट, डॉ. प्रकाश कोठारी यांनाही भेटलो.

माझ्या पतीने मला सर्व पर्याय असतानाही आय.व्ही.एफ करण्यासाठी दबाव आणला. ही सर्व प्रक्रिया घरीच करण्यासाठीही दबाव होता. हे सर्व मी माझ्या पालकांना सांगितले. माझ्या पालकांनी माझ्या सासऱ्यांची (विनायक राऊत) भेट घेतली. जे काही घडत होते, ते माझ्या पालकांनी त्यांच्या कानावर घातले. माझ्या सासऱ्यांनी ( विनायक राऊत) म्हटले की, त्या दोघांचे आतापर्यंत शारीरिक संबंध आले नाहीत.

त्यांच्यात तशी वातावरण निर्मितीही झाली नाही. मी एका ठिकाणी कणकवलीला टेस्ट ट्यूब बेबीची चाैकशी केली आहे. त्यांना टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेने अगोदर एखादे मूल होऊ द्या, त्याने शारीरिक संबंध विषयावर ते दोघे बघतील, असे सासऱ्यांनी माझ्या पालकांना म्हटले, असल्याचा गंभीर आरोप गिरीजा राऊतने पोलिस तक्रारीत केला. आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यासोबतच विनायक राऊत यांनीही माध्यमांसोबत येत गिरीजा राऊतवर गंभीर आरोप केले. गिरीजा राऊतनेही पत्रकार परिषद घेत काही खुलासे केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *