Mumbai Thane Dam Water Levels | ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८०% पाणीसाठा, विसर्ग सुरू, गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत या सात धरणांमध्ये मिळून ऐंशी पूर्णांक बत्तीस टक्के पाणीसाठा होता. मोडकसागर, उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली…