मुंबईत उड्डाणपुलावर रातोरात लागले गुजराती फलक, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू; शिवसेना आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरूच आहे. मुंबईसह अनेक भागात अचानक गुजराती भाषेत पाट्या लागताना दिसत आहेत. त्यामुळे मराठी माणसामध्ये तीव्र संताप उमटत आहे. आता मुंबईतील परळ येथेही रातोरात गुजराती भाषेत सूचना फलक लागले. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार असून हळूहळू मुंबईत गुजरातीचं प्राबल्य वाढवण्याचा…