Headlines

Bachchu Kadu सेनेच्या गळाला? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आमदारकीचा वनवास संपणार? राजकीय समीकरणं बदलणार

Bachchu Kadu सेनेच्या गळाला? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आमदारकीचा वनवास संपणार? राजकीय समीकरणं बदलणार
Bachchu Kadu सेनेच्या गळाला? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आमदारकीचा वनवास संपणार? राजकीय समीकरणं बदलणार


बच्चू कडू, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही ९ मराठी

Bachchu Kadu in Shivsena: राज्यात पुन्हा एकदा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळल्याचे समोर येत आहे. विदर्भासह राज्यात प्रहारचे मोठे जाळे आहे. या संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बच्चू कडूंची काल मुंबईत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीत शिंदे सेनेचे पारडे जड होणार आहे.

प्रहार शिवसेनेते होणार विलीन?

शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडूंची काल बैठक झाली होती. आजही याविषयीची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार आहे. बच्चू कडु यांच्या समोर शिवसेनेने ही मोठी अट ठेवली आहे. बच्चू कडू काय निर्णय घेणार आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जर प्रहार पक्ष आणि संघटना शिवसेनेत विलीन झाली तर बच्चू कडू यांचे राजकीय अस्तित्व आणि त्यांच्या संघटनेचे कार्य याविषयीची मोठी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्यांवरून सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. कडू यांनी शिंदे यांच्या बंडाला जाहीर पाठिंबा दिला होता. ते गुवाहाटीलाही गेले होते. पण नंतर या दोन्ही नेत्यांमधील मतभेद समोर आले होते. पण आता दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कडू आता सत्तेच्या प्रवाहात समाील होतील अशी शक्यता आहे. तर नेहमी स्वतंत्र बाणा जपणारे बच्चू कडू शिंदे सेनेत रमतील का? असाही सवाल विचारल्या जात आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेत बच्चू कडू यांच्या येण्याने जुने नेते अस्वस्थ होतील यात शंका नाही. बच्चू कडू यांचा आक्रमकपणा पाहता पक्षाला फायदा होईल. पण त्यामुळे पक्षातील काही नेते बैचेन होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तर विदर्भात पक्ष बांधणीसाठी त्यांचा फायदा होईल असेही काहींना वाटते.  येत्या 12 मे रोजी 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *