VIDEO : आमच्यासाठी मुंबईच! आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार: देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे, बॉम्बेचं नाव मुंबई (IIT Mumbai) करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचं ते म्हणाले. आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई असं नाव करावं अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री…