तामिळनाडूत राजकीय खळबळ! टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाचा पाठिंबा? थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर
तामिळनाडूच्या राजकारणात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून, अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने राज्यातील प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेसारख्या दिग्गज पक्षांना जोरदार धक्का दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला आहे. तामिळनाडू विधानसभा…