भाजपचे नागपूरचे नगरसेवक अचानक मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांचं बोलावणं; काय घडतंय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना ‘डिनर पे चर्चा’साठी बोलावलं आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीचे जवळपास 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे. गणिताच्या आकड्यात महायुती मजबूत आहे. मात्र कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीकडून खबरदारी घेतली जात आहे….