आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडे चार तास एकाच हॉटेलमध्ये, अर्धा तास गुप्त चर्चा, हॉटेलचा एरिया पूर्णपणे बंद, कुणाचं टेन्शन वाढणार?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे तब्बल साडेचार तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते. त्यामध्ये अर्धा ते एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर…