अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
ठाणे : विधिमंडळाच्या पावसाची अधिवेशनाचे (Assembly) आज सूप वाजले, विरोधकांनी विविध शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरले होते. तसेच, अनेक आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि काही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभावरही लक्ष वेधले होते. त्यात, कल्याण (Kalyan) तहसीलमधील कांबा ग्रामपंचायतीत आदिवासी आणि शेतकऱ्यांची 464 एकर जमीन…