Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात घडलेल्या मॅनहोल दुर्घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुमारे २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने अस्लम शेख…