मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू, शिवसेना आक्रमक, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून थेट आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे, याचदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. ती म्हणजे मुंबईतील साकीनाका परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अस्लम शेख असं या 55 वर्षीय व्यक्तीचं नाव असून, त्यांचा 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर आता याला जबाबदार कोण?…