मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अंजनखेडा गावात श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काही शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची…