Sand : वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक', अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना जागेवरच रद्द होणार
मुंबई : राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. अवैध वाळूची वाहतूक करताना एखादे वाहन सापडल्याच त्याचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील…