Headlines

Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट…. भेटीमागचं कारण काय?

Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट…. भेटीमागचं कारण काय?
Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट…. भेटीमागचं कारण काय?


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत आहे. जळगावसह ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही ठिकाणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद उफाळले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्ली गाठलेल्या एकनाथ शिंदे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या बैठकीत माजी शिक्षणमंत्रीही उपस्थित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ही बैठक अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली असून शिंदे गटातील कोणतेही आमदार, खासदार किंवा स्वीय सहाय्यक उपस्थित नव्हते.
या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, विधान परिषद निवडणुकीतील जागावाटप आणि ‘ऑपरेशन टायगर’संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. चार दिवसांपूर्वी ही भेट होणार होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. आता अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुढे कोणते मोठे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *