
पोस्टमध्ये गौरव यांनी जॉनी लिव्हर यांना आपले प्रेरणास्थान म्हणत खास कॅप्शन लिहीली. प्रिय जॉनी लिवर सर आज आपले पाय आमच्या वास्तू ला लागले आणि आम्ही धन्य झालो.आम्हीच काय माझ संपूर्ण घर, येणारी पिढी,मागची पिढी सगळेच सुखावलो. तुमचा सिनेमा पाहता यावा म्हणून केलेली धडपड कधी दारात उभ राहून, तर कधी खिडकीत उभ राहून, आपले सिनेमे बघितले आहेत.आपण आमच्यासारख्या मुलांसाठी एक उर्जा आहात,आमचे गुरु आहात.खूप खूप प्रेम सर – असं गौरवने कॅप्शनमध्ये लिहीलं होतं.