Headlines

HSC Board Result 2026: ‘लातूर पॅटर्न’ ला मोठा धक्का, सलग दुसर्‍या वर्षी निच्चांकी कामगिरी, 12 वीच्या परीक्षेत पुन्हा सुमार कामगिरी

HSC Board Result 2026: ‘लातूर पॅटर्न’ ला मोठा धक्का, सलग दुसर्‍या वर्षी निच्चांकी कामगिरी, 12 वीच्या परीक्षेत पुन्हा सुमार कामगिरी
HSC Board Result 2026: ‘लातूर पॅटर्न’ ला मोठा धक्का, सलग दुसर्‍या वर्षी निच्चांकी कामगिरी, 12 वीच्या परीक्षेत पुन्हा सुमार कामगिरी


लातूर पॅटर्नची घसरण Image Credit source: फाईल फोटो

Latur Pattern HSC Board Result 2026 : लातूर पॅटर्न हा एकेकाळी शिक्षण क्षेत्रातील परवलीचा शब्द ठरला. पुणे हे विद्येचे माहेरघर असताना सर्वांचा ओढा गेल्या 20 वर्षांमध्ये लातूरकडे वाढले. लातूर पॅटर्नने देशातही ठसा उमटवला. पण लातूर पॅटर्न उभारणारे व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड जाताच या पॅटर्नला मोठा धक्का बसला. आज नुकताच इयत्ता इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली. पण लातूर विभाग सलग दुसर्‍यांदा खालून नंबर वन ठरला. लातूरचा हा घसरता टक्का मराठवाड्यातील शैक्षणिक जगतासाठी धक्का मानल्या जात आहे.

लातूर विभागाची घसरण

इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाला. त्यात कोकण विभागाने एकूण 9 विभागात अव्वल स्थान कायम ठेवले. गेल्यावर्षीही या विभागाने पहिला क्रमांक पटकावला होता. तर या निकालात शिक्षणाची नवीन पंढरी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या लातूर पॅटर्नची पिछेहाट झाली. कोकण विभाग हा 94.14 टक्क्यांनी गुणवत्ता यादीत अव्वल आले. तर लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्क्यांवर घसरला. गेल्या वर्षीची आकडेवारी सुद्धा अशीच धक्कादायक होती. मागील वर्षी लातूर बोर्डाचा निकाल 89.46 टक्के इतके होता. त्यापेक्षा यंदा अजून मोठी घसरण दिसून आली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात लातूर पॅटर्नची मोठी चर्चा होती. पण आता ही ओळख ओसरत असल्याचे निकालावरून समोर आले आहे.

सात साईटवर निकाल जाहीर

नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला वाणिज्य आयटीआयसाठी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 89.79 इतकी आहे. खासगी विद्यार्थी 17 फॉर्म भरणारे 36 हजार 941 प्रविष्ट झाले. उत्तीर्ण झालेले 29 हजार 634 इतके आहेत. तर त्यांची टक्केवारी 80.21 इतकी आहे. रिपीटर एकूण 50हजार 346 विद्यार्थी 18 हजार 349 उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी 36.44 टक्के इतकी आहे.

हा निकाल सात वेबसाईटवर डिक्लेअर करत आहोत. दुपारी 1 वाजता जाहीर होईल. मंडळाची वेबसाईट, डीजीलॉकर, एमकेसीएल, टार्गेट पब्लिकेशन, नवनीत, टीव्ही 9 मराठी, इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी एकावेळी आले तरी साईटवर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी टेलिमानस हेल्पालाईन सुरू केली आहे. 14416 या क्रमांकावर त्यांना संपर्क साधता येईल.

निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *