Headlines

IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..

IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..
IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..


IPL 2026: सचिन तेंडुलकरची अर्जूनला शेवटच्या सामन्यात संधी दिल्यानंतर अशी पोस्ट, म्हणाला की..Image Credit source: PTI

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकवर नावाचा दबाव आहे. वडिलांच्या कामगिरीवरून त्याची तुलना केली जात आहे. पण अर्जुन तेंडुलकर अंत्यत संयमीपणे क्रिकेटमध्ये आपले पाय रोवत आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्सकडून सुरूवात केली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघात आला. पण त्याला लीग फेरीतील 13 सामन्यात बेंचवरच बसावं लागलं. अखेल या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी डेब्यू करताना 4 षटकात 36 धावा देतून एक गडी बाद केला. प्रभसिमरन सिंगला बाद केलं. खरं तर त्याला पहिल्याच षटकात विकेट मिळाली असती. पण ऋषभ पंतने प्रभसिमरन सिंगचा सोपा झेल सोडला होता. इतकंच काय तर क्षेत्ररक्षण करताना त्याने एक झेलही पकडला. फलंदाजीत त्याने 5 चेंडूत पाच धावा काढल्या.

अर्जुन तेंडुलकरच्या या कामगिरीनंतर सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सचिन तेंडुलकरने लिहिलं की, ‘शाब्बास, अर्जुन. संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळले आहेस, त्याचा मला अभिमान आहे. तू तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला, शांतपणे काम केलेस, संयम राखलास आणि शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहिल्यानंतरही सकारात्मक राहिलास. क्रिकेट केवळ कौशल्याचीच नाही, तर संयमाचीही परीक्षा घेते आणि तू या दोन्ही गोष्टी उत्कृष्टपणे हाताळल्या. नेहमी जमिनीवर पाय ठेव आणि खेळावर प्रेम कर. सदैव प्रेम.’

सचिन तेंडुलकर अर्जुनच्या क्रिकेट कारकि‍र्दीवर फार क्वचितच भाष्य करतो. यापूर्वी त्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून होणाऱ्या अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाबद्दल एक पोस्ट केली होती. सारा तेंडुलकरला तिच्या धाकट्या भावाच्या यशाचा आनंद आवरता आला नाही. भावाच्या दमदार कामगिरीनंतर तिने लिहिले, “तू जगातील सर्व सुखास पात्र आहेस. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.”

अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले. त्यावेळी त्याच्यासाठी 20 लाख मोजले होते. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर पहिला सामना 2023 मध्ये खेळला. त्या पर्वात अर्जुनने चार सामन्यांमध्ये तीन बळी घेतले. 2021 ते 2025 पर्यंत अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग होता. 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना मुंबई इंडियन्सकडून ट्रेड केलं. आतापर्यंत अर्जुनने आयपीएलमध्ये 1 कोटी 70 लाख रुपये कमावले आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *