Headlines

IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरने लखनौ सुपर जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने लखनौवर 5 विके्टसने विजय मिळवला. आरसीबीचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. आरसीबी या मोसमात 4 सामने जिंकणारी दुसरी टीम ठरली. आरसीबीआधी राजस्थान रॉयल्सने 4 सामने जिंकण्याची कामगिरी केली होती. आरसीबीला लखनौ विरूद्धच्या विजयामुळे मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये या विजयासह मोठी झेप घेतली आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्सला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी उडी घेतली आहे. बंगळुरु विरुद्ध लखनौ सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती बदल झालाय हे सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबी टेबल टॉपर, राजस्थानला धोबीपछाड

आरसीबीच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 3 संघावर परिणाम झाला आहे. आरसीबीने लखनौला पराभूत केलं. आरसीबीने यासह 2 गुणांची कमाई करत राजस्थानला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकलं. आरसीबीने यासह पुन्हा एकदा सिंहासन मिळवलं. आरसीबीच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार 5 सामन्यानंतर 8 गुण झाले आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा +1.503 असा झाला आहे. या सामन्यनाआधी आरसीबीचा नेट रनरेट हा +0.720 असा होता. आरसीबीने 29 बॉलआधी सामना जिंकल्याने नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने लखनौकडून मिळालेलं 147 रन्सचं टार्गेट 15.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तर राजस्थानची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

तसेच राजस्थान दुसऱ्या स्थानी आल्याने पंजाब किंग्सलाही नुकसान झालं आहे. पंजाबची एका स्थानाने घसरण झाली आहे. पंजाबची दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. पंजाब या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहेत. पंजाबने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा एकमेव सामना हा पावसाने वाया घालवलाय. पंजाबच्या खात्यात 6 गुण आहेत. तर पंजाबचा नेट रनरेट हा +0.720 इतका आहे.

चौथ्या ते आठव्या स्थानापर्यंत फुल ट्राफिक

दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या ते आठव्या स्थानापर्यंत एकूण 5 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या 5 संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले. त्यामुळे या पाचही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. त्यामुळे नेट रनरेटच्या आधारावर हे संघ पॉइंट्स टेबलमध्ये आपलं स्थान मिळवून आहेत.

हैदराबाद, दिल्ली, गुजरात, लखनौ आणि चेन्नई या 5 संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि गुजरातने प्रत्येकी 4 तर इतर तिघांनी 5 सामने खेळले आहेत. हैदराबाद, दिल्ली, गुजरात, लखनौ आणि चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी विराजमान आहेत. मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे. तर केकेआर 5 सामन्यानंतरही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *