Headlines

Ketan Agarwal Case : किल्ल्यावर 24 तास सुरक्षा, पण तिने बनाव केला… प्रत्यक्षदर्शी गार्डने जे सांगितलं त्याने….

Ketan Agarwal Case : किल्ल्यावर 24 तास सुरक्षा, पण तिने बनाव केला… प्रत्यक्षदर्शी गार्डने जे सांगितलं त्याने….
Ketan Agarwal Case : किल्ल्यावर 24 तास सुरक्षा, पण तिने बनाव केला… प्रत्यक्षदर्शी गार्डने जे सांगितलं त्याने….


पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केतनला संपवण्याचा कट रचला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या संदर्भातील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच लोहगडावर घटनेच्या दिवशी काय घडलं होतं? याचा तपशीलही पोलीस गोळा करत आहेत.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा गार्ड धीरज जाधव यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. जाधव यांनी घटनेनंतरच्या पाच मिनिटाची सर्व कहाणी स्पष्ट केली आहे. घटनेच्यावेळी जाधव ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना लांबून कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला होता. हा आवाज आल्यानंतर ते घटनास्थळी धावतपळत गेले. तिथे गेल्यावर त्यांनी काय झालं? असा सवाल पर्यटकांना केला.

ती एवढंच म्हणाली…

यावेळी सिया गोयलने एकच शब्द उच्चारला. कोणी तरी व्यक्ती खाली पडला, असं सियाने घटनेनंतर सांगितलं. त्यानंतर ती जास्त काही बोलली नाही. पण ती घाबरलेली होती. तिचे हात थरथरत होते. गार्डच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी सिया घाबरलेली दिसत होती. मदतीसाठी हाका मारत होती. तिने अधिक काही सांगितलं नाही. पण मी लगेचच पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. किल्ल्याच्या परिसरात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. अनेकदा संपर्क करण्यात अडचणी येत असतात, अशी माहितीही जाधव यांनी दिली.

नेटवर्कचा प्रॉब्लेम…

घटनेनंतर सिया जोरजोरात ओरडत होती. तो एक अपघात असल्याचा तिने बनाव केला होता. किल्ल्याच्या परिसरात 24 तास सुरक्षा असते. बाजूलाच पोलीस स्टेशनही आहे. पण या परिसरात नेटवर्क नसल्याने कधी कधी संपर्क करण्यात अडथळे येतात, अशी माहिती त्याने दिली.

आज कोर्टात हजर

दरम्यान, सिया आणि चेतनची कोठडी आज संपली आहे. दोघांनीही कोर्टात हजर करण्यात आलं आहे. दोघांची अजून चौकशी करायची आहे. या घटनेत अजून कोणी आहे का? याचा तपास करायचा आहे. तसेच या घटनेचा प्लान कसा रचला गेला याची डिटेल्स माहिती मिळवायची असल्याने पोलीस कोर्टाला सिया आणि चेतनची कोठडी वाढवण्याची मागणी करत आहेत. कोर्ट या दोघांची कोठडी वाढवते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *