Headlines

Maharashtra 12th Board Result 2026 : इयत्ता 12 वीचा निकाल DigiLocker आणि SMS वर असा चेक करा, मार्कशीट अशी करा डाऊनलोड

Maharashtra 12th Board Result 2026 : इयत्ता 12 वीचा निकाल DigiLocker आणि SMS वर असा चेक करा, मार्कशीट अशी करा डाऊनलोड
Maharashtra 12th Board Result 2026 : इयत्ता 12 वीचा निकाल DigiLocker आणि SMS वर असा चेक करा, मार्कशीट अशी करा डाऊनलोड


बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HSC परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन तसेच इतर माध्यमांद्वारे सहज पाहू शकतात. mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. तसेच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डिजिलॉकरवरून निकाल कसा पहायचा?

सर्वप्रथम https://www.digilocker.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

Login/Register या पर्यायावर क्लिक करा.

आधीपासून नोंदणी केलेली असल्यास थेट लॉगिन करा.

Maharashtra Board HSC Result 2026 या लिंकवर क्लिक करा.

रोल नंबर आणि इतर तपशील भरून सबमिट करा.

स्क्रीनवर तुमची मार्कशीट दिसेल.

SMS द्वारे निकाल कसा पाहायचा

मेसेज बॉक्समध्ये टाइप करा: MHHSC (Space) तुमचा सीट नंबर

हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा

काही क्षणांत विषयानुसार गुणांसह निकाल मिळेल

महाराष्ट्र बोर्डाची 12वीची मार्कशीट कशी डाउनलोड करायची?

अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा

होमपेजवर Maharashtra Board HSC Result 2026 या लिंकवर क्लिक करा

तुमचा रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून सबमिट करा

स्क्रीनवर निकाल दिसेल; त्याचा PDF किंवा प्रिंटआउट काढून ठेवा.

कधी झाली होती परीक्षा?

महाराष्ट्र बोर्डाने 12वी (HSC) बोर्ड परीक्षांचे आयोजन 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान केले होते. या परीक्षेत राज्यातील सर्व विभागांतून सुमारे 14 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. मागील वर्षाच्या निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक होते. दोघांच्या निकालात सुमारे 6% फरक दिसून आला. मुलांची पास होण्याची टक्केवारी 85.70% होता, तर मुलींची टक्केवारी 91.64% इतकी होती. यंदाही निकालात मुलीच बाजी मारण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारावीत चांगले मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला खास महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले  आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *