
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्णजे 10 वी आणि 12वी. गेल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागल्यावर आता 10 वीचा निकाल कधी याची उत्सुकता अनेक विद्यार्थ्यांना होती. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपणार असून, आज 8 मे रोजी दुपारी 11 वाजता इयत्ता 10वीचा निकाला जाहीर होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2026 या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती. याच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) चा निकाल आज दुपारी 1वाजता ऑनलाइन पद्धतीने लागेल. त्यारपूर्वी 11 वाजता मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन दहावीचा विभागवार निकालासंदर्भात माहिती आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. तर 10वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा रिझल्ट, गुण, टक्केवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन तपासू शकतील. दहावीचा निकाल अगदी झटपट तुम्ही टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरही बघू शकता.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विभागनिहाय निकाल 11 वाजता समजेल, मुलींनी बाजी मराली की मुलं पुढे गेली, एकूण टक्केवारी किती, हे सर्व सविस्तार निकालात दुपारी समजणार आहे.
टीव्ही9 मराठीवरही झटपट पहा 10 वीचा निकाल
दहावी परीक्षेचा निकाल तुम्हाला झटपट बघायचा असेल तर तुम्ही www.tv9marathi.com वर हा निकाल आरामात बघू शकता. यासोबतच mahahsscboard.in तसेच results.navneet.comवरही तुम्ही निकाल बघू शकता. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आईचे नाव आणि इतर काही माहिती भरावी लागणार आहे.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची मार्कशीट तुमच्या हाती पडेल. यासोबतच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. टीव्ही9 मराठीवर निकाल पाहण्यासाठी www.tv9marathi.com वर भेट द्या. होम पेज किंवा टीव्ही9 मराठी करिअर विभागामध्ये महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा. किंवा महाराष्ट्र बोर्ड दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर तिथे आपला परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती भरा आणि समिट करा. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर समोर असेल. अशा सोप्प्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. झटपट तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. आता निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. दहावीच्या निकालाची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.