
25 Apr 2026 02:56 PM (IST)
निरुपमांना काय अडचण? मराठी सक्तीवरून देशपांडेंचा सवाल
रिक्षा-टॅक्सी चालकांना अडचण नाही मग संजय निरुपम यांना काय अडचण?… मराठी सक्तीवरून संदीप देशपांडेंचा संजय निरूपम यांना सवाल… आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कानशिलात लावली असती, किमान शिंदेंनी तरी निरुपमांच्या कानशिलात लावावी… संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया…
25 Apr 2026 02:45 PM (IST)
ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकवू, वाद नको- फडणवीस
मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाही… ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू… यावरून विवाद नको, अशी सरकारची भूमिका… रिक्षा-टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य…
25 Apr 2026 02:30 PM (IST)
ठाकरेंसोबत भेट नाही, फडणवीसांनी वृत्त फेटाळलं
उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं… आम्हाला लपूनछपून भेटण्याची आवश्यकता नाही… मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा
25 Apr 2026 02:15 PM (IST)
फडणवीस-ठाकरेंची ‘वर्षा’वर मध्यरात्री भेट?
उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’ निवास्थानी भेटल्याच्या बातम्या… आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्टिवटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
25 Apr 2026 02:00 PM (IST)
संजय गायकवाड व बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – माकप
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे संपादक प्रशांत अंबी यांना अत्यंत वाईटरित्या शिवीगाळ केली आहे व धमक्या दिल्या आहेत. माता भगिनी वरून त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही सभ्य माणसाला सहन होणार नाही अशी आहे. आमदार संजय गायकवाड यांचा व त्यांच्या पक्षाचा श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारला पाठिंबा आहे. आपल्याला व आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले काय म्हणणे आहे? हे स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ अजित नवले म्हणाले.
25 Apr 2026 01:50 PM (IST)
आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर
शिवाजी कोण होता ?, या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय. मात्र आज बुलढाणा आणि मोताळा येथे गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला. तर छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडणारे आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्या कडून बुलढाणा सह मोताळा येथे त्यांच्या प्रतिमेला दुधाने आंघोळ करण्यात आली. एकप्रकारे कार्यकर्त्यांकडून सुद्धा आमदार गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळ चे समर्थन केल्याच यावरून दिसते.
25 Apr 2026 01:40 PM (IST)
बीड तालुक्यातील लोणीघाट गावात शेतीच्या वादातुन चौघांकडुन एका व्यक्तीला मारहाण
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीघाट गावात शेतीच्या वादातून सख्या भावासह एकुण चार जणांनी मिळून एका व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. यामध्ये अनिल कटके नामक व्यक्ती गंभीर जखमी असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे
25 Apr 2026 01:30 PM (IST)
मंत्री नितेश राणेची परतवाडामध्ये सभा
29 तारखेला परतवाडा येथील जयस्तंभ चौकात मंत्री नितेश राणे जाहिरसभा होणार आहे. परतवाडा प्रकरण हे संपूर्ण राज्यात गाजत असतांना आता या प्रकरणात नितेश राणे यांनी उडी घेतली. सकल हिंदू समाज कडून नितेश राणे यांची सभा आयोजित केली आहे. यावेळी अंजनगाव सुर्जीचे देवनाथ मठाचे पिठाधिश जितेंद्र महाराज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई राहाटकर ह्या देखील उपस्थित राहणार. तरुणींचे अश्लील व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी पोलीसांनी एकूण 8 आरोपींना अटक झालेली आहे. यामध्ये मुख्य आरोपी हा 19 वर्षीय अयान अहमद आहे.
25 Apr 2026 01:20 PM (IST)
गुटखा तस्करांशी संबंध, पोलीस निलंबित
यवतमाळ पोलीस कर्मचारी अविनाश ढोणे तसेच त्याचे सहकारी पोलीस शिपाई बबलू पठाण आणि प्रशांत राठोड या तिघांना गुटखा तस्करांशी संगनमत करणे आणि त्यांच्याकडील दोन गुटख्याची पोते चोरल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
25 Apr 2026 01:09 PM (IST)
गुप्त बैठक कशाला घेतील-सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च देवेंद्र फडणवीस आणि उबाठाचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे हे आहे. या दोन नेत्यांना संघटनेच्या सर्वोच्च पदावर असताना गुप्त बैठका घेण्याची आवश्यकता नाही/ घ्यायची असेल तर छातीठोकपणे करतील हे दोन्ही नेते वाघासारखे पराक्रमी नेते आहे यांना कशाला गुप्तपणे बैठकी घ्यावे लागेल, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मला व्यक्तिगत रीतीने वाटते की संविधानामध्ये आदर्श नागरिक विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी व्याख्या केली आदर्श नागरिक अफवा पसरवत नाही कोणत्या पोर्टलवर चुकीच्या बातम्या देत नाही तो खरा आदर्श नागरिक अन्यथा अशी कृती लोकशाहीला अभिप्रेत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
25 Apr 2026 01:00 PM (IST)
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौंडी येथील महादेव मंदिरात पूजा
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौंडी येथील महादेव मंदिरात पूजा करण्यात आली. अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या महादेव मंदिरात त्यांनी पूजा केली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे उपस्थित होते.
25 Apr 2026 12:53 PM (IST)
गुटखा तस्करांशी संबंध तीन पोलिसांचं निलंबन
पोलीस कर्मचारी अविनाश ढोणे तसेच त्याचे सहकारी पोलीस शिपाई बबलू पठाण आणि प्रशांत राठोड या तिघांना गुटखा तस्करांशी संगनमत करणे आणि त्यांच्याकडील दोन गुटख्याची पोते चोरल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई
25 Apr 2026 12:33 PM (IST)
उद्धव ठाकरेंना लपूनछपून भेटण्याची आवश्यकता नाही – देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंना लपूनछपून भेटण्याची आवश्यकता नाही. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबत वर्षा निवासस्थानी कुठलीही भेट झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
25 Apr 2026 12:28 PM (IST)
परतवाडा प्रकरण नितेश राणे यांची सभा
परतवाडा प्रकरण हे संपूर्ण राज्यात गाजत असतांना आता या प्रकरणात नितेश राणे यांनी उडी घेतली. सकल हिंदू समाजाकडून नितेश राणे यांची सभा आयोजीत केली आहे. यावेळी अंजनगाव सुर्जीचे देवनाथ मठाचे पिठाधिश जितेंद्र महाराज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई राहाटकर ह्या देखील उपस्थित राहणार.
25 Apr 2026 12:17 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर मध्ये दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर मध्ये दखल. मंदिरात थोड्याच वेळात घेणार दर्शन. दर्शनानंतर गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला लावणार उपस्थिती.
25 Apr 2026 11:55 AM (IST)
गळवेढा तालुक्यातील खडकी गावातील तलावात तिघांचा बुडून मृत्यू प्रकरण
गळवेढा तालुक्यातील खडकी गावातील तलावात तिघांचा बुडून मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. आईबरोबर धुणे धुवायला गेलेल्या सोहम घोडके आणि श्रेया घोडके या दोन्ही मुलांचा तलावात मृतदेह सापडला आहे. मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.
25 Apr 2026 11:40 AM (IST)
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत., समर्थकांकडून आधीच विजयाचा आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
25 Apr 2026 11:30 AM (IST)
बांधकाम कामगाराचे साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा ट्रक पकडला, परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यातल्या परतुर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांचा संसार उपयोगी साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा एक ट्रक स्थानिक सनियंत्रण समितीच्या दक्षतेने पकडण्यात आला. या ट्रकमध्ये बांधकाम कामगारांना मोफत दिले जाणार संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात भरून देण्यात येत होतं, याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे साहित्य नेमकं कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं याचा अधिक तपास परतुर पोलिसांकडून करण्यात येत आहे, सध्या हा ट्रक परतूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.
25 Apr 2026 11:14 AM (IST)
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 संचालक ठरले अपात्र…..
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 संचालक अपात्र ठरले आहेत. नियमबाह्य खर्च केल्याने संचालक अपात्र ठरल्याने अमरावती जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विविध कलमाचे उल्लंघण केले. उपविधीचे उल्लंघन सह अर्थसंकल्प बाबीत त्रुटी आढळल्या आहेत. आता बाजार समितीमध्ये प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
25 Apr 2026 10:50 AM (IST)
परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक प्रकार
जालना जिल्ह्यातल्या परतुर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांचा संसार उपयोगी साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा एक ट्रक स्थानिक सनियंत्रण समितीच्या दक्षतेने पकडण्यात आला. या ट्रकमध्ये बांधकाम कामगारांना मोफत दिले जाणार संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात भरून देण्यात येत होतं, याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे साहित्य नेमकं कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं याचा अधिक तपास परतुर पोलिसांकडून करण्यात येत आहे, सध्या हा ट्रक परतुर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.
25 Apr 2026 10:40 AM (IST)
मी कोणाच्याही विरोधाने थांबणारा माणूस नाही- संजय निरुपम
मी कोणाच्याही विरोधाने थांबणारा माणूस नाही. रिक्षा चालकांचे परवाने रद्द करू नका, असेही मोठे विधान संजय निरुपम यांनी केले आहे.
25 Apr 2026 10:30 AM (IST)
सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस
सोलापूरमधील वाढत्या उष्णतेचा परिणाम विमानसेवेवरही दिसून येत असून, स्टार एअरची सोलापूर मुंबई थेट विमानसेवा आता आठवड्यातून केवळ दोन दिवसच चालवली जाणार आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे विमानाचा पेलोड (वाहून नेण्याची क्षमता) अपेक्षित प्रमाणात घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. यामुळे १ मेपासून ही सेवा फक्त मंगळवार आणि गुरुवार या दोनच दिवशी उपलब्ध राहणार असून, हा बदल ३१ मेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
25 Apr 2026 10:20 AM (IST)
मेळघाटमधील हरिसालमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पाणीपुरवठा बंद..
हरीसालमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा..सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने बॅनर बाजी करीत नागरिकांनी केला निषेध. वारंवार ट्रान्सफॉर्मर खराब होत असल्याने तक्रारी करूनही टाळाटाळ होत असल्याने नागरिक त्रस्त. महावितरणने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त न केल्यास हरिसाल परतवाडा मार्गावर चक्काजाम करण्याचा नागरिकांचा इशारा..
25 Apr 2026 10:10 AM (IST)
सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवड शहरात
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. समर्थकांकडून आधीच विजयाचा आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
25 Apr 2026 10:05 AM (IST)
गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्यात आला
गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध शिवरायांचा हा पुतळा होता. अखेर पोलिस आणि नगर पालिका प्रशासनाची शिवप्रेमींशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा पुतळा हलवला जातोय. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
25 Apr 2026 09:56 AM (IST)
राहाता / अहिल्यानगर – नशेत मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या
राहाता शहरात मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महात्मा फुले नगर परिसरात घडली. नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून खून केला यामुळे परिसरात खळबळ माजली असून भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतलं.
25 Apr 2026 09:43 AM (IST)
बागेश्वर बाबा, गायकवाड यांच्या मुसक्या आवळा – सचिन खरात
बागेश्वर बाबा आणि आमदार गायकवाड यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांचा कडेलोट करा असं वक्तव्य राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केलं आहे.
25 Apr 2026 09:28 AM (IST)
लासलगाव – एसटी सवलतीच्या ओळखपत्रासाठी १९९ ऐवजी ५० रुपये जादा वसुली
लासलगाव (नाशिक) : एसटी सवलतीच्या ओळखपत्रासाठी १९९ ऐवजी ५० रुपये जादा वसुली., महिला एजंटंकडून पावतीशिवाय अतिरिक्त रक्कम मागणी करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा संताप झाला असून पैसे देण्यास ठाम नकार दिला. चौकशीदरम्यान कॅमेरा चालू असल्याचे पाहताच एजंट महिलांनी प्रश्न टाळून काढला पळ. आगार व्यवस्थापक सविता काळे यांनी हस्तक्षेप करत शासन दरातच ओळखपत्र वाटप करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. जादा पैसे घेतल्यास परत करण्याचे आदेश दिले.
25 Apr 2026 09:15 AM (IST)
जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांत ६३ जणांना डेंग्यूची लागण
जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांत ६३ जणांना डेंग्यूची लागण झाली. जिल्ह्याभरातून २ हजार ७३७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आसी, त्यात 63 जणांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले. डेंग्यूची लागण झालेल्या काही रुग्णांवर उपचार करण्यात आले तर काही रुग्णांवर सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत.
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक १४ रुग्ण, एरंडोल येथे ६, पारोळा येथे ५, जळगाव शहरात ८, भुसावळ येथे ८, पाचोरा येथे ४ तर अमळनेर येथे ५ रुग्णांची नोंद
25 Apr 2026 09:04 AM (IST)
पुणे – वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात. गोळीबारासाठी वापरलेली पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केली. पूर्ववैमनस्त्यातून तून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार करणाऱ्या सहा जणांपैकी प्रीतम ठोंबरे आणि साहिल राऊत दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलं.
25 Apr 2026 09:00 AM (IST)
बदलापुरात रिक्षाचालकांनी केले इसमावर वार!
बदलापुरात रिक्षाचालकांनी केले इसमावर वार. रिक्षाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्यानं वाद झाल्यानंतर घडली घटना. पोलिसांकडून फक्त मारहाणीचा जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 Apr 2026 08:53 AM (IST)
पालकांचा अजब प्रताप, 16 वर्षांच्या मुलीचं टक्कल करून घरात बसवलं
अमरावती – 16 वर्षीय तरूण मुलीचे पूर्ण केस कापून टक्कल करून घरात बसवलं.अमरावतीच्या वरूड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी अजब प्रताप केला आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता, त्यामुळे मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दे असे मुलीला तिच्या आई वडिलांनी सांगितलं होतं. त्यानंतर तिचे केस कापून छड केल्याचा तक्रार पीडित मुलीने आई-वडिलांविरुद्ध दिली.
25 Apr 2026 08:50 AM (IST)
कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणी बंद
कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणी बंद राहणार आहे. बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागालाही पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.