
The liveblog has ended.
16 Apr 2026 11:02 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : पंजाबचा 7 विकेट्सने विजय, क्विंटन डी कॉकचं शतक व्यर्थ, मुंबईचा पराभव
पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत 19 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला आहे. पंजाबने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबने 196 रन्सचं टार्गेट हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. पंजाबसाठी कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.
16 Apr 2026 10:50 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : पंजाबला तिसरा झटका, कॅप्टन श्रेयस अय्यर आऊट
मुंबई इंडियन्सने पंजाबला तिसरा झटका दिला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. मात्र श्रेयसने त्याची भूमिका चोखपणे पार पाडत पंजाबला चौथ्या विजयाजवळ आणून ठेवलं. श्रेयसने 66 धावा केल्या.
16 Apr 2026 10:46 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : प्रभसिमरन-श्रेयसचं अर्धशतक, पंजाब विजयाच्या दिशेने
प्रभसिमरन सिंह याच्यानतंर श्रेयस अय्यर यानेही अर्धशतक झळकावलं आहे. यासह पंजाब मुंबई इंडियन्स विरुद्ध विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे. पंजाबच्या विजयाची आता औपचारिकता बाकी आहे.
16 Apr 2026 10:25 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : प्रभसिमरनचा तडाखा, सलग दुसरं अर्धशतक, पंजाब मजबूत स्थितीत
पंजाबचा ओपनर प्रभसिमरन सिंह याने आयपीएल 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे. प्रभने अवघ्या 23 बॉलमध्ये हे अर्धशतक झळकावलं आहे. प्रभच्या आयपीएल कारकीर्दीतील नववं अर्धशतक ठरलं.
16 Apr 2026 10:17 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : श्रेयस-प्रभसिमरन जोडी जमली, मुंबईला तिसऱ्या विकेटची प्रतिक्षा
श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह ही जोडी जमली आहे. या दोघांनी पंजाबला 9 ओव्हरमध्ये 2 आऊट 88 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. प्रभसिमरन नॉट आऊट 35 रन्सवर खेळत आहेत. तर कॅप्टन श्रेयस अय्यर 18 रन्सवर खेळत आहे.
16 Apr 2026 10:01 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : श्रेयस-प्रभसिमरनने पंजाबला सावरलं, मुंबई तिसऱ्या विकेटच्या शोधात
पंजाबने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 61 रन्स जोडल्या आहेत. अल्लाह गजनफर याने पंजाबला 2 झटके दिले. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह या दोघांनी पंजाबला सावरलं. श्रेयस 12 आणि प्रभसिमर 16 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
16 Apr 2026 09:54 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : पंजाबला दुसरा धक्का, अल्लाह गजनफरकडून कूपर कॉलनची शिकार
अल्लाह गजनफर याने पंजाबला दुसरा धक्का दिला आहे. अल्लाहने प्रियांश आर्या याच्यानंतर कूपर कॉलनची शिकार केली आहे. कॉनलीने 12 बॉलमध्ये 17 रन्स केल्या.
16 Apr 2026 09:47 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : पंजाबला पहिला झटका, अल्लाह गजनफर याच्याकडून प्रियांश आर्याचा गेम
मुंबई इंडियन्सच्या अल्लाह गजनफर याने प्रियांश आर्या याला दीपक चाहर याच्या हाती कॅच आऊट करत पंजाब किंग्सला पहिला झटका दिला आहे. प्रियांशने 9 बॉलमध्ये 15 रन्स केल्या.
16 Apr 2026 09:34 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 196 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार? पंजाब जिंकणार?
पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्य ही भारतीय सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 196 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. ही सलामी जोडी पंजाबला कशी सुरुवात करुन देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
16 Apr 2026 09:20 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : क्विंटन डी कॉकचं खणखणीत शतक, मुंबईच्या 20 ओव्हरमध्ये 195 रन्स
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 195 धावा केल्या आहेत. मुंबईसाठी क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 112 रन्स केल्या. मुंबईने या जोरावर पंजाबसमोर 196 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. आता पंजाब हे आव्हान गाठणार की मुंबई कमबॅक करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
16 Apr 2026 09:04 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : कॅप्टन श्रेयसकडून कर्णधार हार्दिकचा गेम, सीमारेषेवर कडक कॅच
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने बाउंड्री लाईनवर झेव्हीयर बार्टलेट याच्या मदतीने कडक रिले कॅच घेत मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकने 12 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
16 Apr 2026 09:01 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : क्विंटन डी कॉकचं खणखणीत शतक, पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई
मुंबई इंडियन्सचा ओपनर क्विंटन डी कॉक याने खणखणीत शतक झळकावलं आहे. क्विंटनने वानखेडे स्टेडियममध्ये पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत 53 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. क्विंटनचं हे आयपीएलमधील तिसरं शतक ठरलं.
16 Apr 2026 08:56 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : क्विंटन डी कॉक शतकाच्या उंबरठ्यावर, पलटण द्विशतकाच्या दिशेने
क्विंटन डी कॉक आणि नमन धीर या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली आहे. क्विंटननंतर नमननेही अर्धशतक केलं. मात्र नमन त्यानंतर आऊट झाला. मात्र क्विटंनने तडाखा कायम ठेवलाय. क्विंटनंने हार्दिक पंड्यासह फटकेबाजी करत मुंबईला 16 ओव्हरनंतर 3 आऊट 160 रन्सपर्यंत पोहचवलंय. क्विंटन 50 चेंडूत 95 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर हार्दिकने 5 रन्स केल्या आहेत.
16 Apr 2026 08:42 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : मुंबईची सेट जोडी शशांक सिंहने फोडली, नमन धीर आऊट
शशांक सिंह याने नमन धीर आणि क्विंटन डी कॉक ही सेट जोडी फोडली आहे. शशांकने नमन धीर याला आऊट केलं आहे. नमनने 31 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. नमन आऊट झाल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला आहे.
16 Apr 2026 08:41 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : क्विंटन डी कॉकनंतर नमन धीरचं अर्धशतक, मुंबई मोठ्या धावसंख्येच्या दिशेने
क्विंटन डी कॉक याच्यानंतर नमन धीर यानेही अर्धशतक झळकावलं आहे. नमनने 28 चेंडूचा सामना करुन अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे मुंबई आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात आहे.
16 Apr 2026 08:33 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : नमन धीर-क्विंटन डी कॉकची शतकी भागीदारी, मुंबई मजबूत स्थितीत
नमन धीर-क्विंटन डी कॉक या जोडीने धमाका केला आहे. अर्शदीपने सलग 2 झटके दिल्याने मुंबईची 2 आऊट 12 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर कॉक आणि नमनने मुंबईचा डाव सावरला आणि संधी मिळेल तशी फटकेबाजी केली. यासह दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.
16 Apr 2026 08:24 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : क्विंटन डी कॉकचं झुंजार अर्धशतक, मुंबईला सावरलं
मुंबईचा ओपनर क्विंटन डी कॉक याने पंजाब विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. अर्शदीपने मुंबईला सलग 2 झटके दिले. त्यामुळे मुंबई बॅकफुटवर फेकली गेली होती. मात्र क्विंटनने नमन धीरसोबत पलटणला सावरलं आणि अर्धशतक झळकावलं आहे.
16 Apr 2026 08:05 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : सलग 2 झटक्यानंतर नमन धीर-डी कॉकने मुंबईला सावरलं
अर्शदीप सिंह याने मुंबई इंडियन्सला 2 बॉलवर 2 झटके दिले. त्यामुळे मुंबई बॅकफुटवर गेली. मात्र नमन धीर आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईचा डाव सावरला आहे. या दोघांनी विकेट न गमावता मुंबईला 6 ओव्हरमध्ये 48 रन्सपर्यंत पोहचवलं.
16 Apr 2026 07:44 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : अर्शदीपची कमाल, सलग 2 झटके, मुंबई बॅकफुटवर
मुंबई इंडियन्सला संयमी सुरुवातीनंतर सलग 2 झटके लागले आहेत. अर्शदीप सिंह याने मुंबईला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. अर्शदीपने रायन रिकेल्टन याच्यानंतर सूर्यकुमार यादव याला आऊट केलंं. रायनने 2 धावा केल्या. तर अर्शदीपने सूर्याला पहिल्याच बॉलवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
16 Apr 2026 07:33 PM (IST)
MI vs PBKS Live Score Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, क्विंटन-रायन मैदानात
मुंबई विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला सुरुवात झाली आहे. पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
16 Apr 2026 07:18 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कॅप्टन), कूपर कोनोली, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
16 Apr 2026 07:14 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : मुंबइ इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबइ इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.
16 Apr 2026 07:06 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : पंजाबने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध बॉलिंगचा निर्णय
मुंबई विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. रोहित शर्मा याला दुखापतीमुळे पंजाब विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.
16 Apr 2026 06:36 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे नाणेफीचा कौल कुणाच्या बाजून लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
16 Apr 2026 06:34 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत टफ फाईट पाहायला मिळाली आहे. उभयसंघात एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता मुंबई आणि पंजाबपैकी कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
16 Apr 2026 06:29 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स टीम
प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन) प्रियांश आर्य, कूपर कोनोली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, विजयकुमार विशक, अर्शदीप सिंग,
युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, सुर्यांश शेडगे, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, विशाल निषाद, अजमतुल्ला उमरझाई, लॉकी फर्ग्युसन, प्रवीण दुबे आणि
बेन द्वारशुईस.
16 Apr 2026 06:26 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, रघु शर्मा, राज बावा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, विल जॅक्स, मयंक रावत, कृष भगत, रॉबिन मिंझ, अल्लाह गझनफर, दानिश मलेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
16 Apr 2026 06:13 PM (IST)
MI vs PBKS Live Updates : मुंबई विरुद्ध पंजाब आमनासामना, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील पाचवा सामना आहे. मुंबईने विजयी सुरुवातीनंतर सलग 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर विजय मिळवण्याचं आव्हान आहे.