Headlines

GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या

GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या
GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या


GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या Image Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धेत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या अवघड जागेचं दुखणं झालं आहे. सूर्यकुमार संघात असून नसल्यासारखा आहे. खरं तर त्याने फलंदाजीत एक काळ गाजवला आहे. पण आता त्याच्या फलंदाजीतून तसं घडताना दिसत नाही. आयपीएल स्पर्धेत सहा सामने खेळला. पण प्रत्येक वेळी पदरात निराशा पडली आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सूर्यकुमार यादवची विकेट जिथे फटका मारेल तिथे आणि चेंड़ू सोडेल तिथे पडत आहे. त्यामुळे चेंडू सोडला काय आणि मारला काय विकेट पडणार हे समीकरण झालं आहे. सूर्यकुमार यादव इतक्या वाईट काळातून जात आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला अशीच प्रचिती आली. नाणेफेकीचा कौल गमावल्याने वाटेला प्रथम फलंदाजी आली. मुंबई इंडियन्सची सुरूवात निराशाजक झाली. 25 धावांवर दुसरी विकेट पडली आणि सूर्यकुमार फलंदाजीला आला. पण 10 चेंडूत त्याचा खेळ खल्लास झाला.

मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. कगिसो रबाडाने प्रदीर्घ काळानंतर वेगवान गोलंदाजीचा मारा केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा त्याचा सामना करणं कठी गेलं. मुंबई इंडियन्सच्या सुरूवातीचे तीन विकेट एकट्या रबाडाने घेतल्या. तिन्ही फलंदाजी वेगवान चेंडूचे बळी ठरले. या सामन्यात दानिश मालेवारने पदार्पण केलं त्याला 147.6 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. त्याला चेंडू कळायच्या आत पॅडवर लागला आणि पायचीत झाला. त्याने क्विंटन डिकॉकला 149.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. या चेंडूला उसळी होती. त्यामुळे चेंडूवर प्रहार केला पण झेल बाद झाला. सूर्यकुमार यादवला या दोघांपेक्षा अजून वेगाने चेंडू टाकला.

कर्णधार शुबमन गिलने पावर प्लेचं शेवटचं षटक रबाडाकडे सोपवलं. सूर्यकुमार यादवने या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. दोन्ही चेंडू 145 ते 148 किमी प्रतितास वेगाच्या मधे होते. तिसरा चेंडू रबाडाने 152 किमी प्रती तासाने टाकला. हा चेंडू सामना करताना सूर्यकुमार यादव थोडक्यात वाचला आणि एक धाव घेतली. पाचव्या चेंडूला त्याला पुन्हा स्ट्राईक मिळाली. हा चेंडू रबाडाने 15.1 किमी प्रतितास वेगाने टाकला. या चेंडूचा टप्पा पडतात आत आला आणि दोन स्टम्प घेऊन गेला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *