Headlines

Mumbai local shocker : ना गम, ना पश्चात्ताप.. तरुणाचा खून करून आरोपी लोकलमधून उतरला आणि… CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?

Mumbai local shocker : ना गम, ना पश्चात्ताप.. तरुणाचा खून करून आरोपी लोकलमधून उतरला आणि… CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
Mumbai local shocker : ना गम, ना पश्चात्ताप.. तरुणाचा खून करून आरोपी लोकलमधून उतरला आणि… CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?


पाऊस सुरू झाल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. लोकलमध्ये झालेल्या या हत्येमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हत्येनंतर आरोपी बिनधास्त लोकलमधून उतरून इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही गम किंवा पश्चात्ताप नसल्याचं दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा वावर दिसत आहे. दरम्यान, हा आरोपी बोरिवलीतच लपला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी विविध पथकं तयार करून या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

मयंक लोहार या तरुणाची काल पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये हत्या करण्यात आली. मयंक लोहार हा विरार परिसरात वास्तव्यास होता. तो अंधेरीच्या वेस्टसाईडमध्ये तो सेल्समन म्हणून काम करायचा. रोज रात्री 10 च्या दरम्यान घरी जायचा. अंधेरी ते विरार हा मयंकचा रोजचा प्रवास ठरलेला होता. काल रात्री तो फर्स्ट क्लास डब्यातून चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलमधून अंधेरीतून निघाला होता. पाऊस येत होता म्हणून त्याने लोकलचा दरवाजा बंद करायला सांगितलं. किरकोळ वाद टोकाला पोहोचला. त्यातून बाचाबाची आणि हाणामारी झाली. या हाणामारीचं पर्यावसान हत्येत झालं. आरोपीने धारदार शस्त्र बॅगेतून काढून मयंकवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मयंकचा जागीच मृत्यू झालाय.

ट्रेन क्रमांक 90663

मुंबई लोकलमध्ये हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये वादातून चाकू मारून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना 23 जूनच्या रात्री चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये घडली. लोकल ट्रेन क्रमांक 90663 मध्ये अंधेरी ते बोरिवली दरम्यान हा हल्ला झाला. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. रात्री 11 वाजून 4 मिनिटांनी लोकल बोरिवली स्थानकात पोहोचली होती. 11 वाजून 22 मिनिटांनी डॉक्टरांनी तपासून मयंक यांना मृत घोषित केले.

पोलिसांची चक्रे फिरली

आरोपी बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक 6 वर लोकल ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच उतरून पसार झाला. घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तात्काळ ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्हीत काय दिसलं?

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आला असून त्यात आरोपी दिसत आहे. बोरिवली स्थानकात ट्रेन आल्यानंतर आरोपी ट्रेनमधून आरामशीर उतरताना दिसत आहे. आरोपीने काळे कपडे घातलेले आहेत. खांद्यावर काळी बॅग आहे. दाढी वाढलेली आहे. हा आरोपी संपूर्ण स्टेशन परिसरात बिनधास्त फिरताना दिसत आहे. लिफ्टमधून जाताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चात्ताप दिसत नाही. भीती दिसत नाही. पळून जातानाही तो दिसत नाही. नॉर्मल फिरताना दिसत आहे. त्यानंतर तो स्टेशनमधून बाहेर पडताना दिसत असून भरपावसात भिजत जाताना दिसत आहे. मात्र, तो नशेत असल्यासारखा दिसत आहे. बोरिवली स्थानकातील रात्री साडे दहाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *