कर्मचाऱ्यांचे विषय न सुटल्यास महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. कामगार नेते रवींद्र सावंत
ठोक-कंत्राटी मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास 9 ऑगस्टपासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार नेते रवींद्र सावंत यांनी दिला. ठोक मानधनावर पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या असुविधांबाबत, त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आम्ही यापूर्वीही आपणास वांरवार लेखी निवेदने दिली आहेत. शिष्टमंडळासमवेत प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करताना चर्चेदरम्यान त्यांच्या समस्यांचे गांभीर्यही आम्ही आपल्या निदर्शनास आणून देण्याचा प्रामाणिकपणे…