
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले इतकेच नाही, तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. ही घटना इतकी किळसवाणी होती, की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पीडित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कॅमेऱ्यासमोर होणार असल्याचे आधीच समोर आले होते. आता या प्रक्रियेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीचा मृत्यू ॲस्फिक्सियामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
ॲस्फिक्सियामुळे व्यक्तीला नीट श्वास घेता येत नाही. आरोपीने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबल्यामुळे तिच्या मेंदू आणि इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही. चिमुकलीचा मृत्यू हा अत्याचारानंतर तोंडात मोजा कोंबल्यामुळे झाला आहे. तोंडात मोजा कोंबल्यामुळे तिला श्वास घेता आला नाही. शवविच्छेदनातून ही अत्यंत थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे.