Headlines

Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे…

शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा मोठी कारवाई करत साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर धाडसत्र राबवले आहे. या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिक पेढे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये विक्रीस असलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात काही पेढे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

साई मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले पेढे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे पेढे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *