Headlines

लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा

लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा


राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी मुलगा आणि मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही, हे सहज समजू शकणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सादर करण्यात आली. विशेषतः परभणी जिल्ह्यात तब्बल 48% मुलींचे अल्पवयात विवाह झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कायद्याने बालविवाह गुन्हा असतानाही अनेक ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने सरकार सतर्क झाले आहे.

या नव्या नियमामुळे लग्नपत्रिका पाहताच वर-वधूचे वय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बालविवाह लपवणे कठीण होईल आणि अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *