
Uday Kotak : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केल्यानंतर सर्वत्र तिच चर्चा सुरुर आहे. कोरोना काळात ज्याप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान लोकांची कामं सुरु होती, त्याच प्रमाणे आता देखील काम करण्याचा सल्ला कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. सामान्य व्यक्तींसोबतच आता उद्योजकांमध्ये वर्क फ्रॉम होमच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, देशावर अशी वेळ आली आहे की, सर्व कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या पर्यायावर विचार केला पाहिजे?
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी इराण संकटा दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक गंभीर चेतावनी जारी केली आहे… CII वार्षीक बिझनेस समिट 2026 मध्ये त्यांनी सांगितलं आहे की, देशाला आता कठीण काळासाठी तयार राहण्याची गरज आहे. कोटक यांनी इशारा दिला की, गेल्या आठ आठवड्यांपासून इराण संघर्षाचा आर्थिक परिणाम मोठ्या प्रमाणात शांत होता. पण आता ही शांतता संपुष्टात येणार आहे. जर इराण युद्ध लवकर थांबलं नाही, तर आपण एका मोठ्या आर्थिक धक्क्यासाठी तयार राहिले पाहिजे.” असं देखील उदय कोटक म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि WFH साठी समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करताना सांगितलं की, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटिंग आणि विदेशात प्रवास करणं कमी केलं पाहिजे… ज्यामुळे पेट्रोल – डिझेलवर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येईल. यावर कोटक यांचं म्हणणं आहे की, आपण संकट येण्याची प्रतीक्षा करता कामा नये, सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करायला हवा…
भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल
सध्या स्थितीवर भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी देखील स्वतःचं मत माडलं आहे. त्यांच्या मते पूर्णपणे वर्क फ्रॉम होम हा सर्वच सेक्टरसाठी योग्य पर्याय नाही. टीम वर्क आणि एकमेकांच्या मदतीसाठी ऑफिसमध्ये येणं फार गरजेचं आहे… पण सध्याचं संकट पाहता, ‘हायब्रिड मॉडेल’ योग्य पर्याय आहे… म्हणजे कर्मचाऱ्यांनी काही दिवस घरून तर काही दिवस ऑफिसमधून काम करणं योग्य पर्याय आहे.
हिरो एंटरप्रायझेसचे सुनील कांत मुंजाल
हिरो एंटरप्रायझेसचे सुनील कांत मुंजाल यांनी अलर्ट करत सांगितलं की, कोरोना काळात कोणताच दुसरा मार्ग नसल्यामुळे WFH चा पर्याय योग्य ठरत होत. पण एके दिवशी याचा फटका क्रिएटिव्हिटी आणि वर्ट कल्चरला बसू शकतो… ऑफिसमधील वातावरण कामासाठी अधिक चांगलं असतं… मात्र, त्यांनी तेलाच्या संकटाच्या काळात अनावश्यक प्रवास कमी करण्याचं समर्थन केलं आहे.
उद्योजक हर्ष गोयंका
उद्योजक हर्ष गोयंका यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन फक्त एक पर्याय नाही तर, जागतिक अर्थिक अस्थिरते दरम्यान, भारताची ‘आर्थिक ढाल’ सशक्त करण्यासाठी एक मंत्र आहे… एक जबाबदार नागरिक म्हणून एक वर्ष सोन्याची खरेदी करु नका. स्थानिक प्रॉडक्टचा अधिक वापर करा… अनावश्यक इंधन खर्चात कपात केल्याने अब्जावधी डॉलर्सच्या परकीय चलनाची बचत होऊ शकते. जेव्हा आपण घरून काम (WFH) करतो किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, तेव्हा आपण देशाचं आयात बिल थेट कमी करतो. असं देखील हर्ष गोयंका म्हणाले आहेत.